शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

ज्येष्ठ समीक्षक मधुकर हातकणंगलेकर यांचे निधन

By admin | Updated: January 25, 2015 13:40 IST

मराठी साहित्य क्षेत्रात समीक्षेचा मानदंड म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्यिक मधुकर दत्तात्रय हातकणंगलेकर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २५ - मराठी साहित्य क्षेत्रात समीक्षेचा मानदंड म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्यिक मधुकर दत्तात्रय हातकणंगलेकर यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. ८१ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे हातकणंगलेकर यांनी मराठी आणि इंग्रजीत एकूण १५ हून अधिक पुस्तकांचे लेखन केले होते. 
मराठी साहित्यामध्ये हातकणंगलेकर हे समीक्षक म्हणून ओळखले जात असले तरी समीक्षा म्हणजे जड, कठीण आणि सर्वसामान्य वाचकांच्या पलीकडचे असते हा समज त्यांनी मोडून काढला होता. समीक्षक म्हणजे टीकाकार हा प्रचलित समज मोडून नवनवीन साहित्यांचे हातकणंगलेकर यांनी नेहमीच स्वागत केले. १ फेब्रुवारी १९२७ मध्ये कोल्हापूरमधील हातकणंगले येथे त्यांचा जन्म झाला. उच्चशिक्षण घेतल्यावरही हातकणंगलेकर मोठ्या शहरांची वाट न धरता ग्रामीण भागातच राहणे पसंत केले. सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. १९७४ म्ध्ये आदर्श प्राध्यापक हा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. २००८ मध्ये सांगलीत पार पडलेल्या ८१ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. 
 
हातकणंगलेकर यांची साहित्य संपदा
मधुकर हातकणंगलेकर यांची अधोरेखिते, साहित्याचे सोबती, मराठी कथा रुप, परिसर, साहित्य विवेक ही पुस्तकं चांगलीच गाजली. याशिवाय विविध मासिकांमध्येही त्यांनी दर्जेदार लिखाण केले.