शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ पोलीस निरीक्षक आता येणार ट्विटरवर

By admin | Updated: June 9, 2016 01:16 IST

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुणे शहर पोलिसांच्या ट्विटर हँडलचे गेल्या आठवड्यात उद्घाटन झाले़

पुणे : पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुणे शहर पोलिसांच्या ट्विटर हँडलचे गेल्या आठवड्यात उद्घाटन झाले़ त्यानंतर पोलीस आयुक्तांनी आता सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ट्विटर अकाऊंट सुरू करून त्यावर सक्रिय होण्याचा आदेश दिला असून, ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नांना तत्काळ उत्तर द्या, असेही सांगितले आहे. गुन्हेविषयक आढावा बैठकीत आयुक्तांनी शहरात वाढलेल्या घरफोडी आणि इतर गुन्ह्यांचा आढावा घेतला. स्मार्ट पुण्यासाठी स्मार्ट पोलिसिंग करण्याची घोषणा आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पुणे शहर पोलीस दलाचा कार्यभार स्वीकारताना केली होती़ या पार्श्वभूमीवर, आयुक्तांनी सर्वप्रथम शहर पोलिसांचे नवीन संकेतस्थळ सुरू केले. त्यानंतर फेसबुक पेज आणि ट्विटर हँडल सुरू करण्यात आले. प्रत्येक पोलीस ठाण्याचे वेगळे अकाऊंट असावे तसेच संबंधित वरिष्ठ निरीक्षकांनी त्यावर सक्रिय व्हावे, असे सांगण्यात आले आहे.ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही महिन्यांपासून एकही सोनसाखळी चोरीची घटना घडली नाही, तसेच इतर सर्व गुन्ह्यांचा छडा लागला आहे अशा पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांनी नेमक्या काय उपाययोजना केल्या, याबाबत विचारले. संबंधित अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेमक्या कशा प्रकारे पेट्रोलिंग केले तसेच गुन्हे कशा पद्धतीने उघडकीस आणले, हे उपस्थितांना सांगितले. ज्या परिसरातील घरफोड्या आणि इतर गुन्हे वाढले आहेत, त्या संबंधित पोलीस ठाण्यांची नावे बैठकीत वाचून दाखविण्यात आली. बैठकीला सहआयुक्त सुनील रामानंद यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. >उपाययोजना कराआगामी सणाच्या पार्श्वभूमीवरदेखील आयुक्तांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला.शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपाययोजना आखण्यास सांगितले आहे. पोलीस आयुक्तालयात नव्यानेच हजर झालेल्या अधिकाऱ्यांनादेखील आयुक्तांनी सूचना देऊन मार्गदर्शन केले.