शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बदली, बढतीची अधिकाऱ्यांची कामे मंत्रीच करताना दिसतात - नितीन गडकरींची खंत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 05:46 IST

अधिका-यांनी करावयाची बदली, बढतीची कामे मंत्री करतात आणि धोरणे तयार करण्याची मंत्र्यांची कामे अधिकारी करतात. सर्व रितच सध्या बदलली आहे, अशी खंत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केली.

मुंबई - अधिका-यांनी करावयाची बदली, बढतीची कामे मंत्री करतात आणि धोरणे तयार करण्याची मंत्र्यांची कामे अधिकारी करतात. सर्व रितच सध्या बदलली आहे, अशी खंत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केली.जागतिक मराठी चेम्बर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचा २४ वा वर्धापन दिन व उद्योगरत्न पुरस्कारांचे वितरण दादर येथील शिवाजी मंदिर सभागृहात शुक्रवारी गडकरींच्या हस्ते झाले. गडकरी म्हणाले, उद्योग करण्यासाठी हिंमत ठेऊन जोखीम पत्करावी लागते. मराठी माणसात प्रचंड क्षमता आहे. इनोव्हेशन, तंत्रज्ञान व संसाधने ही आगामी काळाची गरज आहे. ती ध्यानात घेत मराठी माणसाने स्वत:ला उद्योग क्षेत्रात झोकून द्यावे.मराठी माणसाने टाटा-बिर्लाला मागे टाकावे, असे आवाहन लोकसभेचे माजी सभापती व चेम्बरचे अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांनी केले.महाराष्टÑ उद्योगात देशात अव्वल आहे. पण त्यामध्ये मराठी उद्योजक नाहीत. मराठी माणूस खूप शिकतो. पण शेवटी तो फक्त नोकरीच करतो. प्रत्येक मराठी घरात एक व्यवसायिक तयार व्हायला हवा, असे आवाहन जोशी यांनी केले.उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी महिला उद्योजिका जयंती कठाळे, म्हैसूर येथील उद्योजक मोहन राव व प्रकाश बेहरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. चेम्बरचे कार्याध्यक्ष खा. शिवाजीराव आढळराव पाटील, प्रकाश चिखलीकर, रविंद्र आवटे, सुरेश महाजन यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.पाणीप्रश्न सोडविण्यासाठी गडकरींनीपुढाकार घ्यावा - डॉ. डी. वाय. पाटीलदेशात १८५७ चे बंड झाले नसते तर आज पाणीप्रश्न निर्माणच झाला नसता. देशाची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी १८५४ मध्ये ब्रिटीशांनी आरखडा तयार केला होता. बंड होताच तो आराखडा रद्द करण्यात आला. गडकरींनी प्रयत्न केल्यास आताही तो आराखडा अंमलात आणून पाणीप्रश्नावर तोडगा काढता येईल, असे मत उद्योगरत्न पुरस्कार विजेतेडॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केले.‘गडकरींनी पंतप्रधान व्हावे’नेटाने प्रयत्न केल्यास काहीच अशक्य नाही, हे सांगताना मनोहर जोशी यांनी नितीन गडकरींनी पुढील वेळी पंतप्रधान बनून या कार्यक्रमात यावे, असे मत मांडले. त्यावर आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्टीकरण गडकरींनी दिले.मराठी माणसात उद्यमशीलतेचा अभावमराठी माणसाच्या घरातच उद्यमशीलतेचा अभाव आहे. मराठी तरुण कायम नोकरीच्याच मानसिकतेमध्ये असतो. माझे जावईदेखील अमेरिकेत नोकरी करतात. पण त्यांना उद्योग करायचा नाही, असे गडकरी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीGovernmentसरकार