शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांना निवडणुकीचे काम, सेवानिवृत्तांना संधी; अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 02:44 IST

खासगी धर्मादाय संस्था, वाचनालय किंवा पतसंस्था असो, त्यांच्या निवडणुका संचलित करण्यासाठी लागणारा अनुभवी वर्ग म्हणून शासकीय सेवानिवृत्त कर्मचाºयांचा येथे चांगला उपयोग करून घेतला जात आहे

संजय पाठक नाशिक : खासगी धर्मादाय संस्था, वाचनालय किंवा पतसंस्था असो, त्यांच्या निवडणुका संचलित करण्यासाठी लागणारा अनुभवी वर्ग म्हणून शासकीय सेवानिवृत्त कर्मचाºयांचा येथे चांगला उपयोग करून घेतला जात आहे. नाशिक पॅटर्न म्हणून तो पुढे येत आहे. चार पैसे मिळण्याबरोबरच निवृत्तीनंतरही समाजाप्रति आपली उपयुक्तता टिकून असल्याचे वेगळे समाधानही त्यांना मिळते.विविध संस्था-संघटनांच्या सहकार खात्यानुसार निवडणुका होतात. धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीतील संस्थांनाही निवडणुका घेणे बंधनकारक असते. त्यामुळे उपरोक्त सर्वांना निवडणूक अधिकारी व मतमोजणी कर्मचाºयांची गरज असते. सेवानिवृत्त सरकारी कर्मचाºयांचे ज्येष्ठ नेते माधवराव भणगे हे त्यासाठी येथे हक्काचे नाव आहे. केंद्र सरकारी प्रेस कामगारांचा मजदूर संघ, नाशिक सार्वजनिक वाचनालय, नाशिक एज्युकेशन सोसायटी आदी मोठ्या संस्था, संघटनांना भणगे हे सेवानिवृत्तांची माहिती कळवतात. निवडणुकीसाठी काम करण्याची तयारी असल्याची संमती घेतली जाते.शासकीय-निमशासकीय ज्येष्ठांना निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जाते. लोकसभा-विधानसभा निवडणुकींप्रमाणेच मतमोजणी करून प्रमाणपत्र देण्यापर्यंतची सर्व कामे निवडणूक अधिकारी आणि त्यांचे पथक करतात. एक ते दीड हजार रुपये मानधन मिळते.निवडणुकीचे काम करण्यासाठी सर्व प्रकारची तयारी आवश्यक असते. सेवानिवृत्त शासकीय कर्मचारीदेखील उत्साहाने त्यात सहभागी होतात. ताण-तणावाचे प्रसंग आले तरी अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.- माधवराव भणगे, समन्वयक, सेवानिवृत्त कर्मचारी संघटना