शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दुबई सहलीसाठी तरुणीकडे वरिष्ठाची शरीरसुखाची मागणी

By admin | Updated: August 7, 2016 21:40 IST

तरुणीकडे शरीरसुखाची मागणी करणा-या खासगी बँकेच्या एका वरिष्ठ अधिका-याविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : क्रेडिट कार्डसंबंधी चांगले काम केल्यामुळे संस्थेमार्फत दिल्या जाणा-या दुबई सहलीसाठी सहकारी तरुणीकडे शरीरसुखाची मागणी करणा-या खासगी बँकेच्या एका वरिष्ठ अधिका-याविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये एका महिला अधिका-याचाही समावेश आहे. याप्रकरणी 24 वर्षीय पिडीत तरुणीने फिर्याद दिली आहे. शंतनू कुलकर्णी आणि दिव्या तिवारी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी एका खासगी बँकेच्या ह्यक्रेडीट कार्डह्ण विभागात सिनीअर बिझनेस एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करते. त्यांच्या बँकेमार्फत क्रेडीट कार्ड विभागात चांगले काम करणा-या कर्मचा-यांना दुबईमध्ये सहलीसाठी पाठवले जाते. पिडीत तरुणीसह तिच्या अन्य तीन सहकारी तरुणींची दुबई सहलीसाठी निवड करण्यात आली होती. मात्र, पिडीत तरुणीकडून एका ग्राहकाच्या अर्जावर वेगळ्या व्यक्तीचे छायाचित्र चिकटवले गेले होते. मुख्या शाखेने याबाबत शंतनू कुलकर्णी आणि क्रेडीट कार्ड विभागाची प्रमुख असलेल्या तिवारी हिला कळवले होते. त्याचा संदर्भ देत मे महिन्यामध्ये तिवारीने पिडीत मुलीला गाठून दुबई सहलीसाठी तिची झालेली निवड रद्द होण्याची शक्यता असल्याची भिती घातली. सहलीला जायचे असल्यास कुलकर्णीला खुश करावे लागेल, त्याच्यासोबत एक रात्र काढावी लागेल असे सांगितले. या प्रकाराला नकार दिलेल्या पिडीत तरुणीवर तिवारी सतत दबाव टाकत होती. सहल जसजशी जवळ येत होती तसतसे ती पिडीत मुलीला जर आमचे ऐकले नाही तर आयुष्य बरबाद करण्याची धमकी देत होती. मात्र, पिडीत मुलगी तिच्या निर्णयावर ठाम होती. एक आॅगस्ट रोजी कुलकर्णी बँकेत आल्यानंतर त्याने पिडीत तरुणीला कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलावून सोबत रात्र काढली नाही तर दुबई सहलीला नेणार नाही असे सांगितले. तसेच, बँकेतून काढून टाकण्याची आणि फ्रॉड प्रोफाईल तयार करण्याची धमकी दिली. तिचा मोबाईलवर अश्लिल शेरेबाजीही करीत लिफ्टमध्ये तिचा हात धरला. घाबरलेली तरुणी कामावरच जाईनाशी झाली. कुटुंबियांनी याचे कारण विचारल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला. खडक पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला आहे.