शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सेनेत राडा-रडी! आमदार-मंत्र्यांत खडाजंगी, उद्धव ठाकरेंनी सुनावले नेत्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 06:21 IST

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत चांगलाच राडा झाला. मंत्री आणि आमदारांमध्ये जुंपल्याने प्रकरण शिवीगाळ व हातघाईवर गेले. खा. श्रीरंग बारणे यांच्याशी झालेल्या शाब्दिक बाचाबाचीमुळे उपनेत्या आ. नीलम गो-हे यांना रडू कोसळले.

अतुल कुलकर्णी मुंबई : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत चांगलाच राडा झाला. मंत्री आणि आमदारांमध्ये जुंपल्याने प्रकरण शिवीगाळ व हातघाईवर गेले. खा. श्रीरंग बारणे यांच्याशी झालेल्या शाब्दिक बाचाबाचीमुळे उपनेत्या आ. नीलम गो-हे यांना रडू कोसळले.‘मातोश्री’वर झालेल्या या बैठकीची माहिती बाहेर जाऊ नये, म्हणून सर्वांचे मोबाइल बंद ठेवण्यात आले होते. प्रारंभीच आमदारांनी स्वपक्षाच्या मंत्र्यांविरुद्ध नाराजीचा सूर लावला. आ. भरत गोगावले यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मंत्र्यांनी पैसे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली. मंत्री आमची कामे करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.त्यावर मंत्री रामदास कदम चांगलेच भडकले. ‘आम्हाला मंत्री बनण्याची खाज नाही, जे मंत्री तुमची कामे करत नाहीत त्यांची नावे घेऊन बोला. सगळ्यांना एकाच पारड्यात का मोजता?’ असे रामदास कदम यांनी खडसावले. त्यावर ‘मला उद्धव ठाकरेंनी विचारले, तर नाव सांगेन. तुम्हाला का सांगू,’ असा प्रतिप्रश्न आ. गोगावले यांनी केल्याने दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते.>नीलम गो-हेंना अश्रू अनावरउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भेट झाली नव्हती म्हणून आ. नीलम गो-हे पुण्याहून चितळेंचे पेढे घेऊन बैठकीला आल्या होत्या. पेढे-पुष्पगुच्छ देऊन ठाकरेंचे अभीष्टचिंतन केले. बैठकीत खा. श्रीरंग बारणे यांनी गो-हे यांच्याविरोधात ‘कॉमेन्ट’ केल्याने दोघांत शाब्दिक चकमक उडाली. स्वत: उद्धव यांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले. बैठक संपल्यानंतर त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली, त्या वेळी ‘हे असले वागणे आम्ही कसे सहन करायचे?’ असे म्हणत नीलम गो-हे यांना अश्रू आवरणे कठीण झाले.>निवडणूक नकोकाही आमदारांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा आग्रह धरला. त्याला आ. शंभूराजे देसाई, आ. राजेश क्षीरसागर यांनी विरोध केला. सरकार पाडून निवडणुकीला कसे सामारे जायचे? हवे तर ज्या मंत्र्यांबद्दल नाराजी आहे त्यांना दूर करा, अशा सूचना त्यांनी केल्याचे समजते.>सर्वांशी बोलून निर्णय : उद्धवकधी सत्तेतून बाहेर पडा म्हणता, कधी सत्तेत राहा म्हणता. आपापसांत भांडता. हे चालणार नाही. मुख्यमंत्री गोड बोलतील, पण तुमची कामे करणार नाहीत. उद्यापासून विभागवार आमदारांच्या बैठका घेईन. सर्वांशी बोलून माझा निर्णय जाहीर करेन.>सत्तेत राहायचे की नाही, लवकरच ठरेल!महागाई वाढली आहे. गोरगरिबांच्या चुली बंद पडत असतील, तर सत्तेत कशासाठी राहायचे? अनेक आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महागाईविरुद्ध राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या पोटावर उठणाºयांसोबत सत्तेत राहायचे की नाही, याचा निर्णय घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरेंना दिले आहेत. आम्ही गरिबांच्या चुली बंद पडू देणार नाही. - खा. संजय राऊत>नेमके काय घडले?खा. श्रीरंग बारणे आणि खा. शिवाजीराव आढळराव पाटील पक्ष सोडून जाणार, अशी सध्या चर्चा आहे. स्वत: खा.बारणे यांनीच बैठकीत हा विषय उपस्थित केला. त्यावर, आढळराव पक्ष सोडणार नाहीत, असे आ. गोºहे यांनी ठामपणे सांगितले. त्यांचे हे विधान बारणे यांना चांगलेच झोंबले. ‘तुम्ही कशाला मध्ये बोलता, तुम्ही तर लक्ष्मण जगताप यांना तिकीट द्यायला निघाला होतात,’ असा टोमणा खा. बारणे यांनी मारला. त्यावरून उभयतांमध्ये चांगलीच जुंपल्याचे बैठकीत असलेल्या नेत्याने सांगितले.