शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

कुणीही या आणि काहीही पाठवा!

By admin | Updated: June 12, 2014 23:26 IST

डाक व्यवस्थेमार्फत ग्राहकांकडून पाठविल्या जाणार्‍या पॅकबंद पार्सलमध्ये कुठल्या प्रकारची वस्तू पाठविली जात आहे, याची शहानिशा होणे गरजेचे आहे.

वाशिम : डाक व्यवस्थेमार्फत ग्राहकांकडून पाठविल्या जाणार्‍या पॅकबंद पार्सलमध्ये कुठल्या प्रकारची वस्तू पाठविली जात आहे, याची शहानिशा होणे गरजेचे आहे. ही प्रणाली डाक कर्मचारी किती प्रभावीपणे निभावतात, याची शहानिशा करण्यासाठी ह्यलोकमतह्णच्या चमूने गुरूवार, १२ रोजी येथील बस स्थानक डाक घरासह खासगी कुरिअर सर्व्हिस देणार्‍या आस्थापनांमध्ये ह्यस्टिंग ऑपरेशनह्ण केले. अत्यंत प्रभावशाली असलेल्या डाक व्यवस्थेतील कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किती दुर्लक्ष करीत आहे, हे यावेळी आढळून आले. कुणीही या आणि काहीही पाठवा, असे चित्र सध्या वाशिम शहरातील कुरीअर सव्र्हीसमध्ये पाहावयास मिळत आहे.सर्वात सोपे आणि स्वस्त माध्यम असलेली डाक व्यवस्था सर्व जगात परिचित आहे. केवळ संदेश पाठविण्यासाठीच नव्हे, तर रजिस्टर्ड व स्पिड पोस्टद्वारे वस्तू विनिमय सेवा देणारी अत्यंत प्रभावशाली व सशक्त प्रणाली म्हणून डाक सेवेची ओळख आहे. पार्सलद्वारे अमली पदार्थ, विस्फोटक वस्तू,रोख रक्कम किंवा इतर संशयास्पद वस्तू पाठवून समाजविघातक कारवाया घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याने डाक सेवेच्या आणि खासगी कुरिअर सेवेच्या माध्यमातून पाठविल्या जणार्‍या पॅकबंद पार्सलमध्ये कोणती वस्तू ठेवली आहे, याची शहानिशा होणे अत्यावश्यक आहे. डाक सेवेच्या माध्यमातून पाठविले जाणारे पार्सल प्रवासात असताना किंवा प्राप्त करणार्‍या व्यक्तीस हानिकारकदेखील सिद्ध ठरू शकते, याची शक्यता पडताळण्यासाठी पॅकबंद पार्सलमधील वस्तू कोणती, हे जाणून घेणे डाक कर्मचार्‍यांचे आद्य कर्तव्य ठरते. डाक कर्मचारी तसेच खासगी कुरिअर सर्व्हिसचे मालक ही व्यवस्था किती चोख पद्धतीने हाताळतात, ही बाब जाणून घेण्यासाठी ह्यलोकमतह्णच्या चमूने गुरूवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये विरोधाभास स्पष्ट जाणवला. यामुळे सार्वजनिक प्रणाली म्हणून कार्य करणार्‍या डाक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.** एसटी डाक कर्मचार्‍यांची नियमांना बगलस्टिंग ऑपरेशनदरम्यान लोकमतह्ण चमूने येथील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अंकल पार्सल या डाक घरातून कुरिअर सर्व्हिस देणार्‍या खासगी अस्थापनांमधून काही पार्सल पाठविले. मुख्य डाक घरात पार्सल स्वीकृत करणार्‍या डाक कर्मचार्‍याने दिलेले पार्सल कानाजवळ हलवित ह्ययात काय?ह्ण एवढीच चौकशी केली व वजन करून त्याची पावती तयार केली. पावतीचा एक भाग पार्सलवर व एक भाग ह्यलोकमतह्णच्या प्रतिनिधीकडे दिला. वास्तविक पाहता डाक कर्मचार्‍याने पार्सल स्वीकारताना त्यात पाठविली जाणारी वस्तू द्रव स्वरूपात आहे, औषध आहे की आणखी काही, याची शहानिशा करायला हवी. ** खासगी कुरिअर सर्व्हिसधारकांचा नाकर्तेपणाडाक सेवेला पर्याय म्हणून खासगी कुरिअर सेवा अस्तित्वात झाली. वाशिम शहरातदेखील अनेक ठिकाणी अशी सेवा देणारी कार्यालये थाटण्यात आली आहेत. या कार्यालयांमध्येदेखील परिस्थिती ह्यजैसे थेह्ण असल्याचे पार्सल पाठविण्यासाठी गेलेल्या ह्यलोकमतह्णच्या प्रतिनिधीस निदर्शनास आले. पार्सलमध्ये काय असेल, याचा साधा मागमूसही न घेणार्‍या खासगी कुरिअर सर्व्हिस कार्यालयातील कर्मचारी पार्सलची नोंद करून पैसे स्वीकारतो. द्रव स्वरूपातील औषध किंवा इतर तुटफूट होणारी वस्तू असेल, तर त्याची अगाऊ सूचना स्वत:हून खासगी कुरिअर स्वीकारणार्‍यास द्यावी लागते. अशातच बिनदिक्कतपणे अमली पदार्थ, स्फोटक पदार्थ पाठविल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. रोखीचा व्यवहार करणारी ह्यहवालाह्णसारखी प्रकरणे याच माध्यमातून जन्माला आली आहे.