शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सिनेट निवडणुकीचे काम ‘आस्ते कदम’, आॅनलाइन निकालाच्या गोंधळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 02:15 IST

मुंबई विद्यापीठावर आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे आलेल्या अतिरिक्त ताणाचा परिणाम अन्य कामावर होताना दिसत आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत सिनेट निवडणुकांचे काम पूर्ण करण्याची मुदत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिली आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठावर आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे आलेल्या अतिरिक्त ताणाचा परिणाम अन्य कामावर होताना दिसत आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत सिनेट निवडणुकांचे काम पूर्ण करण्याची मुदत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिली आहे. पण, अजूनही मतदारांची अधिकृत यादी विद्यापीठाने जाहीर केली नसल्यामुळे सिनेट निवडणुकांचे काम आस्ते कदम सुरू असल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.गेल्या दोन वर्षांपूर्वी बरखास्त केलेल्या सिनेटची निवडणूक लागल्याने विद्यार्थी संघटनांमध्ये नवीन उत्साह संचारला आहे. राज्य सरकारतर्फे नवीन विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी झाल्याने सिनेट निवडणुकांसाठी विद्यापीठात लगबग सुरू झाली आहे. पण विद्यापीठ प्रशासन सध्या निकालांमध्ये गुंतलेले आहे. यामध्ये झालेल्या गोंधळामुळे विद्यापीठ कंबर कसून काम करीत आहे. सिनेट निवडणुकांसाठी अधिकृत मतदार यादी जाहीर न झाल्याने आता विद्यार्थी संघटनांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. या दिरंगाईमुळे आता सिनेट निवडणुका वेळेवर पूर्ण होणार की नाही, याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.मुंबई विद्यापीठाने सिनेट निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली आहे. मतदार नोंदणीची प्रक्रिया जूनमध्ये पूर्ण झाली, यात नोंदणीधारकांचा आकडा ६० हजारांच्या वर गेला आहे. यापुढे अजून कोणतीही हालचाल झालेली नाही. निवडणुकांचे काम पाहण्यासाठी अधिकाºयांची नोंद करावी. निवडणुकांची प्रक्रिया योग्य पद्धतीने पार करण्यासाठी आता योग्य अधिकाºयांची नेमणूक झाली पाहिजे, अशी मागणी संघटनांनी केली आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ