शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

शिवसेना सत्तेसाठी लाचार : राणेंची टीका

By admin | Updated: November 24, 2014 00:13 IST

नेतृत्वाची क्षमता नाही : पक्षात फूट पडू नये यासाठीच सत्तेत जाण्याचा विचार

कणकवली : शिवसेनेला कोकणातील जनतेने ताकद दिली, असे सांगणाऱ्या शिवसेना नेत्यांनी नेहमीच कोकणी माणसाची फसवणूक केली आहे. सत्तेसाठी स्वत: लाचार असलेले दुसऱ्याला काहीही देऊ शकणार नाहीत. पक्षात फूट पडू नये यासाठीच सत्तेत जाण्याचा विचार शिवसेना नेतृत्व करीत असून, पक्ष टिकविण्याची क्षमता त्यांच्यात राहिलेली नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली.येथील ओमगणेश निवासस्थानी आज, रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, आदी उपस्थित होते.नारायण राणे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी स्वाभिमान शिकविला; मात्र आताच्या शिवसेनेच्या नेतृत्वात हा स्वाभिमान राहिलेला नाही. लाचारी रक्तात असेल तर ती बाहेरही दिसतेच. विरोधी पक्ष म्हणून सत्तेबाहेर बसायचे एवढे धाडस शिवसेना नेतृत्वात राहिलेले नाही. शिवसेना मराठीच्या मुद्द्यासाठी तसेच हिंदुत्वासाठी नाही, तर ‘मातोश्री’च्या तसेच मूठभर आमदार, खासदारांच्या उदरनिर्वाहासाठी आता उरली आहे. जैतापूर प्रकल्पाला विरोध कायम राहील, असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंमध्ये या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ठणकावण्याची ताकद नाही. जैतापूर प्रकल्पाचे काम सुरू असून, ते पूर्ण होणारच आहे. त्यामुळे यांच्या विरोधाला कोण विचारतो? अशी स्थिती आहे. उद्धव ठाकरे व शिवसेनेचे नेते जेव्हा कोकणात येतात, तेव्हा येथील निसर्ग चांगला आहे, येथील जनता आमच्यावर प्रेम करते, असे सांगत असतात. मात्र, कोकणी माणसाला काय दिले? त्यांच्या विकासात शिवसेनेचे योगदान काय? याबाबत बोलत नाहीत. उद्योगधंदे तसेच प्रकल्पांना विरोध करणाऱ्या शिवसेनेला बेकार तरुणांना रोजगार कोण देणार, हे समजत नाही. फक्त कॉन्ट्रॅक्ट मिळाले की त्यांचा विरोध मावळतो. पर्यटक म्हणून शिवसेनेचे कार्याध्यक्ष कोकणात येऊन गेले. सासुरवाडीची आठवण बऱ्याच वर्षांनी जावयांना झाली; पण जावयांनी सासुरवाडीला आतापर्यंत विकासात्मक काय दिले? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. शिवसेनेच्या एकाही आमदारात मंत्री होण्याची गुणवत्ता नाही, तसेच मंत्रिपद हाताळण्याची क्षमता नाही. त्यामुळे सत्तेत गेले तरी ही मंडळी कोकणचा विकास करू शकणार नाहीत.काँग्रेसचा मी एक कार्यकर्ता असून, कोकणात मी कुठेही फिरू शकतो. विधानसभा निवडणुकीनंतर मी कोकणातील माझ्या घरी आलो आहे, सासुरवाडीला नाही. जोपर्यंत येथील जनतेचे प्रेम माझ्यावर आहे, तोपर्यंत मी राजकारणात सक्रिय राहीन. राजकारण हे माझ्या उदरनिर्वाहाचे साधन नाही. गेली २५ वर्षे सिंधुदुर्ग तसेच कोकण प्रदेश आपला आहे या भावनेतून येथील विकास करण्याचा प्रयत्न केला. विधायक, सामाजिक, शैक्षणिक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम केले. विकासकामांसाठी निधी खेचून आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात झालेला पराभव हा माझा आहे. पक्षाचा अथवा कार्यकर्त्यांचा नाही. ज्यांनी मला मते दिली व ज्यांनी दिली नाहीत, त्यांचेही मी आभार मानतो, असेही राणे म्हणाले. शासनाला मराठा आरक्षण द्यावेच लागेलमराठा आरक्षण नियमात बसवून दिले आहे. शासनाला ते द्यावेच लागेल. राज्यातील मराठा समाज रस्त्यावर आला तर शासनाला त्यांना सांभाळणे कठीण जाईल. आतापर्यंत मराठ्यांनी मराठापण दाखवून दिलेले नाही. शासन आरक्षणाबाबत बाजू मांडायला कमी पडले आहे. त्यांना उच्च न्यायालयात या प्रश्नी जावेच लागेल, असेही राणे म्हणाले.काँगे्रसच्या राज्यात अस्थिरता नव्हतीअच्छे दिन येणार, असे सांगणाऱ्या भाजपच्या राज्यात अस्थिरता आहे; परंतु काँगे्रसच्या राज्यात ती कधीही नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या बचावासाठीच भाजपला पाठिंबा देत आहे, जनतेसाठी नव्हे, असेही राणे म्हणाले. राज्य दिवाळखोरीत नाहीराज्याच्या अर्थमंत्र्यांनी कोणतेही वक्तव्य करण्याआधी माहिती घ्यावी. महाराष्ट्र नव्हे, तर गुजरातच दिवाळखोरीत आहे. गुजरातचा जीडीपी २६ टक्के आहे. तो २८ टक्क्यांवर गेला तर ते निश्चितच दिवाळखोरीत जाईल. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची क्षमता आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेत आहे, असेही राणे म्हणाले.