शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

सेना-भाजप बेदिलीचा इतर पक्षांना लाभ?

By admin | Updated: October 20, 2016 01:50 IST

भाजपाचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या मुलुंडमध्ये येत्या पालिका निवडणुकीत सत्तेतील मित्रपक्षासोबत दोन हात करावे लागणार आहेत.

मुंबई : भाजपाचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या मुलुंडमध्ये येत्या पालिका निवडणुकीत सत्तेतील मित्रपक्षासोबत दोन हात करावे लागणार आहेत. याची सुरुवात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर झालेल्या पालिकेच्या भ्रष्टाचाररूपी रावण दहनावरून झाली आहे. याचाच फायदा उचलून दोघांच्या भांडणात राष्ट्रवादी, मनसे आणि काँग्रेस यांनी आपली पोळी भाजून घेण्यास सुरुवात केली आहे. मुलुंड पश्चिमेकडील मुलुंड कॉलनी, शंकर टेकडी अशी काही डोंगराळ भागातील झोपडपट्टी सोडल्यास टोलेजंग इमारतींनी हा परिसर व्यापला आहे. जवळपास पावणेचार लाखांची लोकसंख्या असलेल्या मुलुंडमध्ये गुजराती भाषिक अधिक आहेत. तर मुलुंड पूर्वेकडील म्हाडा कॉलनी, गव्हाणपाडा, नाणेपाडा अशा मराठी वस्तीचा यात समावेश आहे. नवीन वॉर्ड रचनेमुळे कुठे खुशी कुठे गमचे चित्र पाहावयास मिळते. त्यातच पक्षांतर्गतच युद्ध पेटल्याने यात आणखीनच रंग चढत आहे.मुलुंड हे उपनगर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला जोडून आहे. शिवाय पूर्व उपनगरातील कालिदास नाट्यगृह याच परिसरात आहे. तर मुलुंड, भांडुप, कांजूरमधील रहिवाशांसाठी असलेले अग्रवाल रुग्णालयही याच भागात आहे. अशी महत्त्वपूर्ण ठिकाणे असलेल्या मुलुंडमध्ये सध्या हरिरोम नगर डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा महत्त्वाचा आहे. हा मुद्दा घेऊन नेतेमंडळीच्या श्रेय लाटण्याचे राजकारणही दिसून येत आहे. तर काही जण पश्चिमेकडील वन विभागाच्या मुद्द्याचा वापर निवडणुकीत करणार आहे. याव्यतिरिक्त झोपडपट्टी पुनर्वसन, रस्ते, नाले, पाणी यादेखील प्रमुख समस्या आहेत. त्यामुळे अशात नगरसेवकासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू झाली आहे. मुलुंडमधील सहा प्रभागांपैकी १०५ आणि १०७ हा महिलांसाठी खुला झाला आहे. तर १०३, १०६ आणि १०८ हा सर्वसाधारण खुला झाला असून १०४ हा इतर मागासवर्गीय (ओबीसी) झाल्याने सर्वांचीच पळापळ सुरू आहे. मुलुंडमध्ये भाजपा आमदार सरदार तारासिंग यांची याच भागात आमदारकीची चौथी वेळ आहे. अशात भाजपाचे मनोज कोटक, प्रकाश गंगाधरे, समीता कांबळे हे तीन नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादीचे नंदकुमार वैती, मीनाक्षी सुरेश पाटील, मनसे नगरसेविका सुजाता पाठक आहेत. अशात नवीन वॉर्ड रचनेमुळे वैती आणि गंगाधरे यांचा वॉर्ड महिला झाल्याने त्यांना धक्का बसला आहे. गंगाधरे १०४ मधून तर वैती १०६ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर नव्याने तयार झालेल्या १०३ वॉर्डमधून भाजपा नगरसेवक मनोज कोटक यांनी फिल्डिंग लावली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात गुजराती वर्गाबरोबरच उच्चभ्रू लोकवस्तीचा भरणा आहे. मात्र अखेर पक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र जर पक्षाने उभे केले नाही तर अनेक जण बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. >या वेळी शिवसेना-भाजपामध्ये रावण दहनावरून सुरू असलेल्या वादाचा तणाव निवडणुकीत रंगणार आहे. सेनेचा वडापाव हातून गेल्याने भाजपा कार्यकर्त्यांना जिलेबी-फाफड्याबरोबरच बिर्याणीचे बेत आखण्यासाठी आर्थिक गणित मांडले जात आहे. आतापासून त्यांनी रिपाइंच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरले आहे. मतदारांना खूश करण्यासाठी हिशोबांची मांडणीही सुरू केली आहे. त्यामुळे मुलुंडमध्ये तरी निवडणुकीत पैशांच्या पावसात उमेदवार, कार्यकर्ते यांना ओढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. >प्रभाग क्रमांक - १०३आरक्षणखुलाएकूण लोकसंख्या - ६१०७१अनुसूचित जाती - ३१५३अनुसूचित जमाती - ९५६ व्याप्ती - भांडुप कॉम्प्लेक्स, विहार लेक, वीणानगर, घाटीपाडा >प्रभाग क्रमांक - १०४आरक्षणइतर मागासवर्गीयएकूण लोकसंख्या - ५९०९७अनुसूचित जाती - ५५९१अनुसूचित जमाती - ११६७व्याप्ती - तांबेनगर, इंदिरानगर, सिद्धार्थनगर>प्रभाग क्रमांक - १०५आरक्षणखुला (महिला)एकूण लोकसंख्या - ५२९६२अनुसूचित जाती - २४८५अनुसूचित जमाती - १२८८व्याप्ती - डॉ. आंबेडकरनगर, नीलमनगर, सज्जनवाडी, पाटीलनगर, गव्हाणपाडा>प्रभाग क्रमांक - १०६आरक्षणखुलाएकूण लोकसंख्या - ४९९५६अनुसूचित जाती - २७०७अनुसूचित जमाती - १२९७व्याप्ती - हरी ओमनगर, म्हाडा कॉलनी, डम्पिंग सॉल्ट लेक, टाटा कॉलनी, नवघर>प्रभाग क्रमांक - १०७आरक्षणखुला (महिला)एकूण लोकसंख्या - ६१२३५अनुसूचित जाती - २०४६अनुसूचित जमाती - १०७८व्याप्ती - नाहूर गावठाण, मुलुंड बेस्ट बस डेपो, सेंट पायस कॉलनी>प्रभाग क्रमांक - १०८आरक्षणखुलाएकूण लोकसंख्या- ५७१४२अनुसूचित जाती - ७२३२अनुसूचित जमाती - १०९८ व्याप्ती - राहुलनगर, मोतीनगर, हनुमानपाडा, आशानगर२>२०१२ मधील विजयी आणि पराभूत उमेदवार (जुन्या रचनेनुसार)वॉर्ड क्र.९८विजयी उमेदवार-समीता कांबळे (भाजपा)- ८३६५पराभूत- नंदा प्रभाकर कांबळे (काँग्रेस) - ७९८०वॉर्ड क्र.९९विजयी उमेदवारभावना जोबनपुत्रा (भाजपा)-९२७५पराभूत, मीनाक्षी सुरेश पाटील (राष्ट्रवादी) - ८५०१(दरम्यान बनावट जात प्रमाणपत्रप्रकरणी भावना जोबनपुत्रा अपात्र ठरल्या)वॉर्ड क्र.१००विजयी उमेदवारनंदकुमार वैती : (राष्ट्रवादी) - ९१२६पराभूत : सत्यवान दळवी (मनसे) -८८१०वॉर्ड क्र.१०१विजयी उमेदवारसुजाता पाठक (मनसे) -९७२०पराभूत : ज्योती वैती (सेना) -८८१४ वॉर्ड क्र.१०२विजयी उमेदवारप्रकाश गंगाधरे (भाजपा) - १०५५० पराभूत : उत्तम गिते (काँग्रेस)- ८६२३वॉर्ड क्र.१०३विजयी उमेदवार मनोज कोटक (भाजपा) - ९३०२पराभूत- जयप्रकाश शेट्टी (काँग्रेस) -७४७४