शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवशाही’साठी ‘सेमी लक्झरी’ बंद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 04:33 IST

एसटी महामंडळाच्या धक्कादायक निर्णयामुळे प्रवाशांना फटका बसणार आहे. एसटी महामंडळाने हिरकणी व रातराणी एसटीच्या जागी शिवशाही चालवण्यात याव्या, अशा सूचना परिपत्रकातून दिल्या आहेत

महेश चेमटे मुंबई : एसटी महामंडळाच्या धक्कादायक निर्णयामुळे प्रवाशांना फटका बसणार आहे. एसटी महामंडळाने हिरकणी व रातराणी एसटीच्या जागी शिवशाही चालवण्यात याव्या, अशा सूचना परिपत्रकातून दिल्या आहेत. यामुळे भविष्यात एसटी महामंडळात साधी आणि शिवशाही हे दोनच पर्याय उपलब्ध राहतील. सेमी लक्झरीच्या तुलनेत ‘शिवशाही’चे तिकीट महाग असल्याने प्रवाशांचा ओढा खासगी बसकडे जाण्याची शक्यता आहे.‘राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने शिवशाही बस दाखल होणार आहेत. या शिवशाही सध्या चालू असलेल्या हिरकणी व रातराणीऐवजी चालवण्यात याव्यात. यामुळे हिरकणी एसटीच्या फेºया शिवशाही बसमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत’, असे साध्या व रातराणी सेवेचे श्रेणी उन्नतीकरण या विषयाखाली काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. हे परिपत्रक राज्यभरात पाठवण्यात आले. सद्य:स्थितीत ४३१ शिवशाही धावत असून यापैकी ३२४ स्वमालकीच्या आणि १०७ भाडेतत्त्वावरील आहेत. एसटी महामंडळ दोन हजार शिवशाही बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल करणार आहे. यापैकी १ हजार ५०० भाडेतत्त्वावर व ५०० बस स्वमालकीच्या असतील. यात शयनयान शिवशाहीचादेखील समावेश आहे.‘उन्नतीकरण’ या नावाखाली एसटीमधील सेमी लक्झरी बंद करण्याचा प्रयत्न महामंडळाकडून करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांना साधी आणि लक्झरी शिवशाही असे दोनच पर्याय उपलब्ध होतील.परिणामी यामुळे एसटीचा प्रवासीवर्ग हा खासगी सेमी लक्झरी बसकडे जाईल. यामुळे महामंडळ डबघाईला येण्याची भीती महामंडळातील वरिष्ठ अधिकाºयांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या विरोधात मतप्रदर्शन केल्यामुळे एसटी कर्मचाºयावर कारवाई करण्यात आली होती. यामुळे सध्या महामंडळातील एकही कर्मचारी व अधिकारी बोलण्यास धजावत नाही.सेमी लक्झरीच्या जागी शिवशाही आल्यास...मुळात हिरकणी आणि रातराणी या ‘सेमी लक्झरी’ प्रकारातील बस आहेत, त्या जागी थेट ‘लक्झरी’ शिवशाही आल्याने साहजिकच भाडेवाढ होईल.भाडे परवडत नसल्याने प्रवासी खासगी बसकडे वळेल.यामुळे एसटी बस बंद होऊन खासगी बस सुरू झाल्याचे उदाहरण कोकणात संगमेश्वर आणि दापोली येथे असल्याचे अधिकारी सांगतात.