शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दूधवाढीच्या औषधांची विक्री; दुकानांवर एफडीएचे छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 05:51 IST

गाई-म्हशींचे दूध वाढावे म्हणून अवैधपणे वापरण्यात येणाऱ्या आॅक्सिटोसिन औषधाची विक्री करणा-या मेडिकल दुकानांविरोधात रविवारी अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) मोहीम उघडली.

मुंबई : गाई-म्हशींचे दूध वाढावे म्हणून अवैधपणे वापरण्यात येणाऱ्या आॅक्सिटोसिन औषधाची विक्री करणा-या मेडिकल दुकानांविरोधात रविवारी अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) मोहीम उघडली. मुंबईसह राज्यात आॅक्सिटोसिनची अवैध विक्री करणा-यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला.एफडीएने रविवारी मुंबई आणि ठाण्यात १७ ठिकाणी छापे टाकले. सायन, परळ, अंधेरी, दहिसर, कांदिवली, घाटकोपर येथे तोतया ग्राहक पाठवून प्रिस्क्रिप्शनशिवाय आॅक्सिटोसिनची अवैध विक्री पकडण्यात आली. दुकानांचे बिलबुकही तपासण्यात आले.प्रसुतीच्या काळात अतिरिक्त रक्तस्रावाला प्रतिबंध करण्यासाठी आॅक्सिटोसिनचा वापर केला जातो. स्तनपानासाठीही हे औषध महत्त्वाचे मानले जाते. मात्र, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनने आणि त्याचा प्रमाणित डोस घेणे आवश्यक असते. औषधाच्या अवैध आणि अतिरिक्त वापराने कर्करोगाची भीती असते. आॅक्सिटोसिनचा गैरवापर होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. शरीरविक्रीच्या रॅकेटमधील दलाल, भाजी व फळांची वेगाने वाढ व्हावी यासाठीही आॅक्सिटोसिनचा वापर वाढत असल्याच्या तक्रारी एफडीएकडे आल्या होत्या.आॅक्सिटोसिनच्या बेकायदेशीर विक्रीविषयी राज्यातील मेडिकल दुकानांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. नियम मोडणाºयांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.- अमृत निखाडे, सहआयुक्त (औषध), अन्न व औषध प्रशासन विभाग

टॅग्स :milkदूधmedicinesऔषधं