मुंबई : शाळाबाह्य मुलांच्या उपस्थितीसाठी शिक्षण विभागाने घेतलेल्या ‘सेल्फी विथ स्टुडंट’च्या निर्णयाची तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी केल्याचे सांगत हा निर्णय स्थगित करण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.शिक्षक संघटनांनी सेल्फीच्या निर्णयास तीव्र विरोध दर्शवित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली होती. जि. प. व महापालिका निवडणुकीत नाराजीचा फटका बसू नये म्हणून शिक्षणमंत्र्यांनी हा निर्णय मागे घेतला.शिवाय, या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने केली, असे सांगत या निर्णयाच्या अपयशाचे खापर अधिकाऱ्यांवर फोडण्यात आले. आता संबंधित सर्व अधिकाऱ्यांची लवकरच एकत्र बैठक घेऊन हा निर्णय केवळ शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी लागू करण्याचा विचार आहे.
‘सेल्फी’चा निर्णय स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2017 04:46 IST