शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
4
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
5
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
6
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
7
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
8
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
9
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
10
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
11
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
12
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
13
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
14
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
15
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
16
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
17
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
18
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
19
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
20
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका

शिक्षकांची हजेरी तपासण्यासाठी ‘सेल्फी’ची सक्ती!

By admin | Updated: February 28, 2016 01:23 IST

शाळेतील हजेरी तपासण्यासाठी शिक्षकांना सेल्फी काढून ती केंद्रप्रमुखासह जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी तसेच शिक्षण विभागाच्या वेगवेगळ्या व्हॉटस्-अ‍ॅप ग्रुपवर पाठविण्याचा

- सचिन राऊत, अकोलाशाळेतील हजेरी तपासण्यासाठी शिक्षकांना सेल्फी काढून ती केंद्रप्रमुखासह जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी तसेच शिक्षण विभागाच्या वेगवेगळ्या व्हॉटस्-अ‍ॅप ग्रुपवर पाठविण्याचा अजब प्रकार अकोला जिल्ह्यात गत काही दिवसांपासून सुरू आहे. तथापि, या प्रकाराने जिल्ह्यातील शिक्षिका कमालीच्या वैतागल्या आहेत. त्यांच्या सेल्फींचा दुरूपयोग होण्याची भीती व्यक्त होत आहे.शिक्षकांनी शाळेत सकाळी १० वाजून २५ मिनिटांपूर्वी पोहोचले पाहिजे, असा नियम आहे. काही शाळांमध्ये हजेरी रजिस्टर, तर काही शाळांमध्ये बायोमेट्रीक मशीन लावण्यात आल्या असून, त्याचे कनेक्शन मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या संगणकाला जोडण्यात आले आहे. तरीही शिक्षकांची हजेरी तपासण्यासाठी अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने त्यांना ‘सेल्फी’ पाठविण्याची सक्ती केली आहे. त्यानुसार शिक्षकांना ‘रोज सेल्फी काढणे, ती केंद्र प्रमुखांच्या व्हॉटस-अ‍ॅपवर पाठविणे’ असा हा नित्यक्रम सुरू आहे.या सेल्फी केंद्रप्रमूख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच शिक्षण विभागाच्या काही व्हॉटस अ‍ॅप ग्रुपवरही पाठवाव्या लागतात.शिक्षिकांना हा प्रकार ओंगळवाणा वाटत आहे. रोज सेल्फी काढून ती एवढ्या लोकापर्यंत पाठविणे म्हणजे एक प्रकारे चारित्र्याचे हननच आहे, असे त्यांचे मत आहे. त्यामुळेच या प्रकाराला शिक्षिकांनी विरोध सुरू केला आहे. शिक्षिकांच्या सेल्फीचा दुरुपयोग झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.असा घ्यावा लागतो ‘सेल्फी’शाळेमध्ये पोहोचल्यानंतर शिक्षिकेला मुख्याध्यापकाचे कार्यालय किंवा त्यांच्या कार्यालयातील घड्याळासमोर उभे राहून सेल्फी घ्यावी लागते. त्यानंतर हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करतानाची सेल्फी घ्यावी लागते. १० वाजून २५ मिनिटांपूर्वी शाळेत पोहोचल्याचे स्पष्ट करणाऱ्या या सेल्फी केंद्रप्रमुखांमार्फत वरिष्ठांकडे पाठविण्यात येतात.उर्दूच्या शिक्षिका बुरखा घालून शाळेत येत असल्याने, त्यांना हजेरीपटाचे छायाचित्र व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवावे लागते.‘चल मॅडम, सेल्फी दे दे रे...’शिक्षण विभागाने जिल्हा स्तरावर, पंचायत समिती आणि केंद्र स्तरावर व्हॉट्स अ‍ॅपचे वेगवेगळे ग्रुप्स बनविले आहेत. या ग्रुप्सवर शाळा उघडण्यापूर्वीच ‘चल मॅडम, सेल्फी दे दे रे...’ अशा प्रकारचे मॅसेजेस पाठविण्यात येतात.शिक्षिकांसाठी ही डोकेदुखी असून, त्यामुळे शिक्षण विभागाने सेल्फीच्या सक्तीचा फतवा तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे. शाळांचे व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. ‘माझी शाळा’ नावाने हे ग्रुप असून, यावर शिक्षकांची हजेरी तपासण्यासाठी सेल्फी मागविण्यात येतात. यासोबतच काही इतर उपक्रमांची छायाचित्रेही या ग्रुपच्या माध्यमातून गोळा करण्यात येतात. शिक्षक वेळेवर शाळेत येतात की नाही, यासाठी सर्वच शिक्षकांना सेल्फी काढून ती केंद्रप्रमुखांना पाठविण्याची सुविधा देण्यात आली आहे.- अंबादास मानकर, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, अकोला