श्रीरामपूर (जि. अहमदनगर): राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी भाजपा नेतृत्वाने राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केल्याचे आता पक्षांतर्गतही पडसाद उमटत आहेत. पक्षाने तत्त्वांना तिलांजली दिल्याची भावना व्यक्त करीत श्रीरामपूरमधील भाजपाच्या कार्यकत्र्यानी गांधी पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन केल़े
भाजपाचे ज्येष्ठ नेते हेरंब औटी व सुनील मुथा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. राहुरीचे वैभव मुळे, राहात्याचे कुमार जंगम, व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष कांतीलाल बोकडिया, श्रीरामपूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील दातीर आदींनी पक्षाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली़
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने गेली 5क् वर्षे भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकत्र्यावर सत्तेच्या बळावर अत्याचार केले. मात्र सत्तेसाठी भ्रष्टाचारी राष्ट्रवादीला बरोबर घेतल्याच्या निर्णयाविरोधात आम्ही आत्मक्लेश करीत असल्याचे औटी म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा उल्लेख अफजलखान असा केला. निकालानंतरही सेना नेते भाजपाशी उद्धटपणाने वागले. राष्ट्रवादीसोबत घरोबा करण्याच्या परिस्थितीला शिवसेनाच जबाबदार आहे, असा दावाही त्यांनी केला.
विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या तळागाळातील कार्यकत्र्यानी प्रचंड मेहनत घेतली.
जनतेने राष्ट्रवादीला स्पष्ट नकार दिलेला असतानाही भाजपाने त्यांना सोबत घेतल्याने जनतेला काय उत्तर द्यावे, असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे कार्यकत्र्यानी सांगितले. (प्रतिनिधी)