शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे २०१९ साठी स्वबळाचे उद्दिष्ट

By admin | Updated: May 4, 2017 01:16 IST

चंद्रकांतदादा पाटील; इशारे, धमकी, नोटीस काही नको; कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

कोल्हापूर : सत्तेत राहून शिवसेनेचे इशारे देणे, धमक्या देणे सुरू आहे. नोटीस पीरियड असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच २०१९ ला कोणत्याही परिस्थितीत देशात ४०० खासदार आणि महाराष्ट्रात १४४ आमदार हे उद्दिष्ट भाजपने समोर ठेवले आहे. त्यासाठी एक आणि एक जागा महत्त्वाची आहे; म्हणून कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे स्पष्ट आवाहन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.कोल्हापूर महानगरच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बुधवारी ते बोलत होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना मंत्री पाटील यांनी आगामी दोन वर्षांतील भाजपचा नियोजित आराखडा मांडला.पाटील म्हणाले, २०१९ ची तयारी आता सुरू झाली आहे. केंद्रामध्ये आम्ही आणि मित्रपक्ष मिळून ३३८ आहोत; परंतु काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी ४०० खासदार ह्यकमळह्ण चिन्हावरील हवेत. त्यासाठीचे नियोजन सुरू आहे. महाराष्ट्रातही मित्रपक्षांसह आपल्याकडे १३७ आमदार आहेत. शिवसेनेची त्यामुळे मदत घ्यावी लागली. त्यामुळे स्थिर आणि शांततेत राज्य चालण्यासाठी भाजपचे १४४ आमदार आणि मित्रपक्षासह १७० आमदारांचे ध्येय आम्ही ठेवले आहे. हे यश मिळाल्यानंतर मग कुणाचे इशारे चालणार नाहीत. आम्ही दोघा-तिघांनी याबाबतचे सर्व गणित मांडले आहे. त्यामुळे एक आणि एक जागा आपल्यासाठी महत्त्वाची आहे.आमदार सुरेश हाळवणकर, संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनीही यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आमदार अमल महाडिक, पुणे ह्यम्हाडाह्णचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, महेश जाधव, बाबा देसाई यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.मित्रपक्षांनाही घेणार सोबतचंद्रकांतदादा म्हणाले की, २०१९ लाही मित्रपक्षांना सोबत घेणार आहोत. राज्यात भाजपचे १४४ आमदार आणि मित्रपक्षांसह १७० आमदारांचे उद्दिष्ट आहे. माझी तर स्वच्छ भूमिका आहे. मंत्रिमंडळ बैठक गुप्त कुठे असते? मित्रपक्षांचे ज्या प्रमाणात आमदार असतील, त्या प्रमाणात त्यांना मंत्रिपदे द्यायची. त्यांचे चार मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला येऊन बसले म्हणून बिघडत नाही; परंतु रोज उठून कुणाचे इशारे चालणार नाहीत.भाषणातून माझा उदो उदो नकोयापुढच्या काळात कोणीही भाषणात माझा उदो उदो करू नये. मी माझ्या राज्यासाठी, पक्षासाठी, लोकांसाठी, समाधानासाठी काम करतो. करायचीच असेल तर भगव्याची, पक्षाची स्तुती करा. माझी नको. तसे कराल तर तुमचे गुण प्लस न होता मायनस होतील, हे लक्षात घ्या, असा दमच यावेळी चंद्रकांतदादांनी कार्यकर्त्यांना भरला.अमित शहा तीन दिवस महाराष्ट्रातपाटील म्हणाले, पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी देशभरात फिरण्यासाठी ७५ दिवसांचे नियोजन केले आहे. त्यातील १६ ते १८ मे असे तीन दिवस ते महाराष्ट्रात असतील. मुख्यमंत्री आणि मी पक्षासाठी १५ दिवस देणार आहोत. नितीन गडकरी यांचा २७ मे रोजी नागपूरला सत्कार आहे. त्यानंतर तीन दिवस आपण त्या विभागात पक्षकार्यासाठी फिरणार आहोत.