शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

विद्यार्थ्यांसमवेत सेल्फीवर शिक्षकांचा बहिष्कार

By admin | Updated: January 9, 2017 02:34 IST

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आजपासून दर सोमवारी सेल्फी काढण्याच्या निर्णयावर जिल्ह्यात शिक्षक संघ व शिक्षक समितीने बहिष्कार घातला आहे.

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आजपासून दर सोमवारी सेल्फी काढण्याच्या निर्णयावर जिल्ह्यात शिक्षक संघ व शिक्षक समितीने बहिष्कार घातला आहे. त्यामुळे अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सवंग लोकप्रियतेसाठी निर्णय घेतले जात असून, शिक्षकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.शाळेतील अनियमित मुले शोधण्यासाठी शासनाने महिन्याच्या दर सोमवारी दहाच्या गटाने शाळेतील सर्व मुलांची वर्गशिक्षकाने सेल्फी काढून फोटो अपलोड करण्याचे आदेश दिले आहेत.यासाठी शासनाने स्वतंत्र अ‍ॅपही तयार केले आहे. या निर्णयाची सोमवारपासून (दि. ९) अंमलबजावणी करण्याचे आदेश आहेत. मात्र, शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याने शासन विरुद्ध शिक्षक एकमेकांसमोर उभे राहिले आहेत.सेल्फीनंतर शाळेतील मुलांची उपस्थिती दररोज शासनाला कळवायची आहे. यामुळे दैनंदिन अध्यापनाकडे दुर्लक्ष होण्याची भीती या संघटनांकडून व्यक्त केली आहे. याआधीच वारंवारच्या आॅनलाइन माहितीबाबत शिक्षकांमध्ये असंतोष आहे. शालेय पोषण आहाराची दैनंदिन माहिती आॅनलाइन भरणे, शिक्षक माहिती, वर्गखोल्यांची माहिती, भौतिक सुविधांची माहिती, शिष्यवृत्ती परीक्षा यांसारख्या अनेक माहिती आॅनलाइन भराव्या लागत आहेत. मात्र, यासाठी शासनाचे कोणतेही अनुदान नसल्याने शिक्षकांना पदरमोड करावी  लागत आहे.सर्व शिक्षकांनी अँड्राइड मोबाईल खरेदी करण्याची सक्ती शिक्षकांना करण्यात येत आहे. ग्रामीण भागात पुरेशी रेंज नसल्याने शिक्षकांना दररोजची माहिती भरण्यासाठी जवळच्या मोठ्या गावात जावे लागत आहे. यामुळे शालेय कामकाजाकडे दुर्लक्ष होत असल्याची शिक्षकांची भावना आहे. सेल्फी आणि गुणवत्तेचा कोणताही संबंध नसल्याने सेल्फीचा निर्णय मागे घेण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.(प्रतिनिधी)अडचणी दूर होतील...आॅनलाइन काही करायचे म्हटले की शिक्षकांना अडचणीचे वाटते. नंतर ते सुरळीत होते. शिक्षकांच्या काही अडचणी आहेत त्या समजून घेतल्या जातील. संघटनांना विश्वासात घेऊन शासन निर्णयाप्रमाणे हे काम सुरळीत सुरू राहील, असा विश्वास माध्यमिकचे शिक्षणाधिकारी हरूण अत्तार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. तरीही विरोध राहिल्यास शासन आदेशाप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल.

अतिरेक टाळा शासनाने मुलांच्या गुणवत्तेला प्राधान्य देत अशैक्षणिक कामे टाळावीत, आॅनलाइन माहितीचा अतिरेक टाळत शिक्षकांना वर्गात शिकवू द्या. त्वरित सेल्फीचा निर्णय मागे घ्यावा; अन्यथा सर्वच आॅनलाइन माहितीवर बहिष्कार घालण्याचा इशारा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिला आहे.

दोन महिन्यांपूर्वी शिक्षक संघाच्या झालेल्या बैठकीत सर्व मुलांच्या सेल्फीचा निर्णय मागे घेऊन फक्त स्थलांतरित होऊन नव्याने दाखल झालेल्या मुलांच्या सेल्फीचा निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, निर्णय कायम राहिल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ या प्राथमिक शिक्षकांच्या प्रमुख संघटनेने सेल्फीवर संपूर्ण बहिष्कार घालत आहे.- बाळासाहेब मारणे, अध्यक्ष (पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ)याला यापूर्वीही समितीने विरोध केला आहे. मात्र शासन निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे आम्ही बहिष्कार घालत आहोत. सध्या जिल्ह्यात बोगस विद्यार्थी नाहीत. एक-दोन ठिकाणी जरी असे प्रकार असले तरी त्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावणे अयोग्य आहे. शासन सवंग लोकप्रियतेसाठी असे निर्णय घेऊन शिक्षकांना वेठीस धरत आहे. - नंदकुमार होळकर, अध्यक्ष (पुणे जिल्हा, शिक्षक समिती)