शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बाळासाहेबांची निवडक भाषणे - फिल्मवाल्यांनी राजकारणाचा केला लोच्या!

By admin | Updated: June 18, 2016 17:20 IST

शिवसेना आपलं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करत आहे यानिमित्ताने दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची काही निवडक भाषणे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 19 - जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…
वक्ते वाढायला लागलेत. ते वाढायला लागले की मलाच धस्स होतं आणि आतून एखादा सांगावा यायचा की अहो किती भाषण किती भाषणं.. लोच्या झोपला रे म्हणून सांगायचे ते सांगण्याच्या अगोदरच पटापट पटापट थोडक्यात काही मुद्दे मांडू. कविवर्य महापौर यांनी (श्री. महादेव देवळे यांना उद्देशून) भावनात्मक अशा काही गोष्टी मांडल्या, कविता आपल्याला सादर केली. पतांनी मुंबईबद्दल उल्लेख केला. मोहन रावले सोडल्यास बाकी आपल्या जागा का गेल्या? बरोबर आहे. जबाबदार कोण? कसे? चार-पाच दिवस लागोपाठ रजा आल्या, केसरी टूर, ही टूर ती टूर, ही टूरटूर नडली. आता मला धस्स होतंय की गणपती आलेत आणि तुम्ही जाणार. कोकणातले लोक तर पहिले जाणार. अगोदर जाऊन तुम्ही करता काय? बाप्पा आला नाही आणि तुम्ही अगोदर काय गप्पा मारताय. मग ते नेताना त्याला गणपती बाप्पा मोरया आणि मग ते चैन पडेना आम्हाला. गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला. आमचंही तेच म्हणणं आहे. मतदार गेले गावाला चैन पडेना आम्हाला. (टाळ्या) बोंबला आता करायचं काय मतं कमी झाली. ही मुंबईची अवस्था बरी नाही आहे. एक ना एक दिवस हे लांडे तुमचा गळा घोटल्याशिवाय राहणार नाहीत. (टाळ्या) ती पोरगी ती इशरत काय ती अंतयात्रा… दफनयात्रा म्हणा हवा तर वाटल्यास. नशीब आपल्या सरकारचं की त्यांनी त्यावर तिरंगा नाही घातला. नाहीतर तोही घालून टाका. कारण या देशात देशद्रोह्यांचा मान पहिला मग तुमचा आठवलं तर. (प्रेक्षकांमधून शेम शेम असा ओरडा) काय चाललंय काय हे. दोन दोन दिवस मुंब्रा बंद काय खाजगी प्रॉपटी आहे काय तुमची…? तुम्हाला आश्चर्य वाटेल. एक पुस्तिका दाखवतो तुम्हाला एक पुस्तिका. लिहिलंय त्यांनी संबंध पानभर लिहिलंय. वाचा आजचा सामना. ही ती पुस्तिका (पुस्तिका दाखवत) त्या पुस्तिकेत अर्धा मोदी अर्धे वाजपेयी असं चित्र आहे. मागे हा नेहमीचा फोटो अरे बापरे बाप आमच्याच मीडियाने सतत आणि सातत्याने महत्त्व दिलंय त्याला. गुजरातमध्ये दंगल झाल्यानंतर मुसलमानांचे हाल काय झाले हे त्याचे चित्रण आहे. गर्भार स्त्रियांची अर्भक बाहेर काढली आणि तलवारीने त्यांचे तुकडे केले. काय भयंकर हिंदू आहात हो तुम्ही. हे बरं नाही इतका निष्ठूरपणा मुसलमानांच्या बाबतीत तरी दाखवू नका. खाटीक तो. त्याच्यामध्ये इतकं काय तुम्ही हे करता त्यांना. गोध्य्राचा डबा ज्या वेळी पेटला आणि तो पेटल्यानंतर तरुण मुलींना खेचत नेलं कुठे तरी लांब तिघातिघात-चौघा-चौघाजणांनी तिच्यावर बलात्कार केले आणि तिचे स्तन रेल्वे रुळावर टाकून देणारी अवलाद कोणाची (प्रेक्षकांमधून निषेध.. शेम…शेम) हे कोणी कृत्य केलं रामसेवकांनी? सगळ्या पुस्तिकेमध्ये  अहमदाबादच्या दंगलीचं दिलंय त्यांनी आणि सगळं भीषण. मोदी हटाव मोदी हटाव…. आमच्याच हिंदुस्थानामध्ये देशाचे तीन तुकडे केले यांनी. आपण मध्ये लटकलो. एक पाकिस्तान इकडे आणि एक पाकिस्तान तिकडे. त्याचा आता बांगलादेश आपल्याच कृपेने झाला. आणि एवढं करूनसुद्धा तुम्ही आमच्या देशावर हुकूमत दाखवायला बघताय. वाजपेयी म्हणताहेत, अशोक सिंघल म्हणताहेत, तोगडिया म्हणताहेत, मी म्हणतोय हे हिंदू राष्ट्र झालंच पाहिजे, अरे झालंच पाहिजे काय आहेच मुळी! (टाळ्या) पण तुमची हुकूमत आमच्यावरती की हे होता कामा नये म्हणून. पाकिस्तानात जाऊन आम्ही बोंबलत नाही आहे, म्हणून मी आजच्या पेपरात स्पष्ट लिहिलं की राहायचं आहे तर राहा नाहीतर चालू पडा. (टाळ्या) बरं.. या दिल्या तुकड्यामध्ये सुखी राहा. पण हे सगळं ओढून आपण आणलंय. मतदानाचं महत्त्व कुठेही बघितलं नाही. प्रत्येकाला आल्यानंतर मी विचारतो की काय रे तू मतदान केलं (बोट दाखवत) अहो हे काय आहे ना. आणि काही लोकांच्या हातावर नसतं.. नाही ते काय आहे की त्या दिवशी मी ते काढून टाकलं. अंगावर एवढे डाग पडलेत त्यामध्ये तुला हा नाही सहन झाला? काय काय धंदे करतोस. काय काय भानगडी करतोस आणि ते सगळे डाग तुझ्या अंगावर आहेत आणि हे बोटावरचं दाखवतोस की हा डाग मी काढून टाकला? झूठ.. मतदान केलं नाही हा बेजबाबदारपणा आहे. हा राष्ट्रद्रोह आहे मी म्हणेन. हिंदूंनी तरी तो करता कामा नये. कल्पना चांगली आहे विधानसभेवर भगवा फडकलाच पाहिजे…. मग आमच्या नावाच्या घोषणा. आणि अमुक आणि तमुक. ऐकायला बरं वाटतं गुदगुल्या होतात. उद्या गणपती आल्यानंतर गावाला जाऊन बसलात तर मुंबईत आलेले गणपती तुमच्या नावाने मतदान करतील काय? सगळे रांगेमध्ये गणपती हातावरती एक ठिपका मारून घेताहेत हा याच्या नावाचा तो त्याच्या नावाचा असं काही आहे का? चैन पडेना आम्हाला कोणाला चैन पडतेय हे असं झाल्यानंतर. पंत पडले, चैन आहे आम्हाला! बरं वाटलं! सगळे गेले. राम नाईक पडले. पडल्याचं दु:ख नाही हो पण कोणी पाडले कालच्या कार्ट्याने? तो नाच्या पोऱ्या, तो लोकसभेमध्ये जाऊन काय करणार आहे? नाचणार आहे काय? दरवेळी आपलं पतंग उडवतोय असं असं करत (हातवारे करून दाखवत) नुसत्या या असल्या लोकांमुळे काही देशाचा कारभार सुधारू शकत नाही. पोरखेळ चाललाय अक्षरश: काय केवढ्या नट्या हो…. येतायेत आणि जातायेत. जया बच्चनचं काय झालं कुणास ठाऊक. रात्री फोन करून विचार (उद्धव ठाकरेंना उद्देशून) (हशा) जया बच्चन, जया प्रदा, हेमा मालिनी अमुक तमुक धर्मेंद्र. सगळं बॉलिवूड हो कार्टुन्स मी काही काढत नाही. तरी कार्टून काढायचंय. पायऱ्या लोकसभेच्या, लोकसभेचे ते खांब बिम वगैरे वगैरे…. आणि बाहेर सगळे प्रोड्युसर आणि डायरेक्टर मंडळी बसलेत. मग काही लोकं विचारतात चॅनेलवाले वगैरे. काय हे बाहेर का बसलेत. कारण सगळे नट-नट्या आत आहेत ना. सह्या घ्यायच्या आहेत. अॅग्रीमेंट करायची आहे ना. म्हणून बाहेर बसलो. आणि ते सगळे आतमध्ये. या बॉलिवूडवाल्यांकडे देशाचा कारभार चालू शकतो? पण आम्ही या पद्धतीने वागतोय. एकदा ठरवलं की याला पाडायचा. या मुसलमानांनी आदेश दिला सगळ्यांना. घराघरात पुस्तकं वाटली गेली आहेत, देशभर वाटली गेली आहेत. म्हणून बुरखा घातलेल्या बायका जास्त दिसू लागल्या तुम्हाला रांगेनं उभ्या होत्या. अशी रांग आपल्या हिंदूंची कुठेही दिसली नाही. सगळीकडे तेच. तोकड्या चड्डीवाले मुसलमान आणि टोपीवाले आणि त्या दाढ्या. ही जी एक रग लागते, जिद्द लागते ही तुमची कुठे गेली. जिंदाबादच्या घोषणांपुरतीच मर्यादित. शपथ घ्यायची तर ही घ्या. जसे ते एकवटलेत तसे आम्हीसुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही. (टाळ्या) तर आणि तरच या लांड्यांना तुम्ही टक्कर मारू शकाल. नाहीतर मुंबईचं काय? महाराष्ट्र गिळतील, देश गिळतील. आणि ते पाप आपल्याकडून होता कामा नये. आपण त्यांना पुरून उरू हो. त्याला आपण भीत नाही पण नुसता एक फतवा गेल्याबरोबर सगळ्यांनी एकजुटीनं रांगेनं आणि आम्ही लंडन बघून आलो, आम्ही हॉलंड बघून आलो, आम्ही न्यूझीलंड बघून आलो. हा लंड बघून आलो, काय आहे काय हे सालं. (टाळ्या) घरबसल्या बघता येतो तिकडे काय जायचं. (हशा) म्हणजे नकाशावरून म्हणतोय मी. गैरसमज करू नका नकाशावरून बरं…! जबाबदारी ओळखा आपली काय आहे ती. ही जबाबदारी एवढीच की मतदानाच्या दिवशी कोणीही हिंदूंनी गाव सोडता कामा नये. गणपतीला जाऊ शकता नाही असं नाही. पण आता आपणच ही काळजी घेतली पाहिजे. निवडणूक आयुक्ताला सांगितलं पाहिजे की लागोपाठ अशा रजा आल्यानंतर निवडणुका होता कामा नये. तो प्रयत्न तर आपण करूच. आता हा पण गेलेला आहे आपला संजय राऊत. असं पुन्हा करू नका एकदा फटका खाल्ला आहे पुन्हा फटका देऊ नका. आणि विधानसभा म्हणजे महाराष्ट्राचं नाक आहे आणि हे नाक आपल्या हातनं कापलं जाता कामा नये. महाराष्ट्र असला तर आपण, देश वाचणार आहे, हिंदुस्थान वाचणार आहे. (टाळ्या) ते वाचवण्याचं काम तुमच्या हातामध्ये सोपवून जास्त बळावण लावत नाही. नाहीतर लोच्या झोपण्याची शक्यता आहे! रंगात आलेले असतात… आम्हाला असं मागून स्टेजवर यायला सांगितलं. म्हटलं का रे? तर म्हणे दुसऱ्या बाजूला कपाट आहे. (लोच्या झाला रे या नाटकाच्या सेटवरील कपाट) म्हटलं काय आहे. या कपाटातनं आम्ही आलो असतो. (टाळ्या) आणि बरं.. फक्त आमच्या हातात तलवार नसती. हे लोच्या झाला रे पाहताना सुद्धा. निवडणुकीत विधानसभेमध्ये आपला जो लोकसभेत लोच्या झाला तसा लोच्या विधानसभेत होता कामा नये! असं सांगून आपल्यावरती जी जबाबदारी टाकली आहे….
मतदान केल्याशिवाय गणपतीला जाऊ नका.
जय हिंद! जय महाराष्ट्र!!
(सौजन्य - http://shivsena.org/m/)