शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

‘एकीकरण समितीचे जास्तीत जास्त आमदार निवडून द्या’ - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 01:29 IST

बेळगावसह सीमाभागाच्या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सर्व ताकदीनिशी आम्ही लढत आहोत. याबरोबरच या प्रश्नी सीमाभातील मराठी जनतेची साथ हवी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे जास्तीत जास्त संख्येने आमदार निवडून द्यावेत, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

बेळगाव : बेळगावसह सीमाभागाच्या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सर्व ताकदीनिशी आम्ही लढत आहोत. याबरोबरच या प्रश्नी सीमाभातील मराठी जनतेची साथ हवी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे जास्तीत जास्त संख्येने आमदार निवडून द्यावेत, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.बेळगाव येथील सी. पी. एड. मैदानावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील होते. व्यासपीठावर कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री जयंत पाटील, माजी खासदार निवेदिता माने, कॉ. कृष्णा मेणसे, किरण ठाकूर, धैर्यशील माने, उपमहापौर मधुश्री पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.पवार म्हणाले, बेळगावात एकीकरण समितीचे महापौर, उपमहापौर निवडून येतात. हे सर्वजण एकदिलाने काम करत मराठी भाषिकांच्या हिताची जपणूक करत आहेत. सीमाप्रश्नी माझा सर्वांशी सुसंवाद आहे. महाराष्ट्राच्या जनतेसह देशपातळीवर सीमाप्रश्न सुटावा अशी भावना आहे. सीमाप्रश्न बेळगावपुरता मर्यादित नाही, तर मी बिदर, भालकीचा देखील विचार करतो. आगामी निवडणुका हा या सगळ्याचा शेवटचा टप्पा आहे.ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, शरद पवार यांनी हरीश साळवे यांच्यासारखे निष्णात वकील देऊन न्यायालयाच्या कामकाजात बळकटी दिली आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या या प्रश्नाची न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी वाटचाल सुरू आहे. समस्त सीमा भाग पवारांच्या योगदानानबद्दल कायम ऋणीअसेल.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार