शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सहा साखर कारखान्यांवर जप्ती; साखर आयुक्तांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 06:54 IST

एफआरपीची रक्कम न देणाऱ्या कारखान्यांमध्ये सांगलीतील २, सोलापूरमधील ३ आणि उस्मानाबाद येथील १ अशा सहा कारखान्यांचा समावेश आहे.

पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) न देणाऱ्या राज्यातील सहा साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करावी, तसेच संबंधित कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम व्याजासहित वसूल करण्यात यावी, अशा सूचना साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. एफआरपीची रक्कम न देणाऱ्या कारखान्यांमध्ये सांगलीतील २, सोलापूरमधील ३ आणि उस्मानाबाद येथील १ अशा सहा कारखान्यांचा समावेश आहे.ऊसदर नियंत्रण कायद्यानुसार १९६६ कमल ३ (३) नुसार उसाची किंमत एफआरपीप्रमाणे १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. मात्र, या साखर कारखानदारांनी शेतकºयांना एफआरपीची रक्कम अद्याप दिली नाही. दरम्यान, राज्यातील साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची साखर संकुलात नुकतीच बैठकदेखील पार पडली. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत एफआरपीबाबत चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तांनी कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.सांगली जिल्ह्यातील रायगाव येथील केन अ‍ॅग्रो शुगर कारखान्याने ४ कोटी ६ लाख ५७ हजार, तर गोकुळ शुगर्स निमगाव या कारखान्याने १६ कोटी ५३ लाख ७० हजार रक्कम थकविली आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील मातोश्री लक्ष्मी शुगरने ९ कोटी ४१ लाख ५२ हजार, श्री मकाई ससाका, भिलारवाडी कारखान्याने ७ कोटी ३२ लाख ५२ हजार आणि विठ्ठल रिफार्इंड, निमगाव कारखान्याने १५ कोटी १४ लाख २४ हजार एफआरपीची रक्कम थकविली आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील रांजणीमधील नॅचरल शुगर अ‍ॅण्ड अलाईड या कारखान्याने १६ कोटी २ लाख २५ हजार एफआरपीची रक्कम अद्याप दिली नाही.२.६० लाख हेक्टरवर उसाची लागवडयंदा सरासरीपेक्षा २.६० लाख हेक्टरवर उसाची लागवड जास्त झाली आहे. तसेच गाळप हंगाम १ आॅक्टोबरपासूनच सुरू केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, मागील एफआरपीची रक्कम अद्याप दिली गेली नसल्याने साखर आयुक्तांनी या सहा कारखान्यांवर कारवाईचे आदेश देऊन एफआरपीची थकीत रक्कम तत्काळ व्याजासहित वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने