शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

दोन देशी कट्टय़ांसह जिवंत काडतूस जप्त

By admin | Updated: February 25, 2017 02:13 IST

आरोपीस अटक; बुलडाणा जिल्ह्यातील सोनाळा येथील घटना

सोनाळा (बुलडाणा),दि.२४- मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सोनाळा पोलिसांनी येथील मेघा हॉटेलमध्ये छापा टाकला असता, एका व्यक्तीजवळून दोन देशी कट्टे व दोन जिवंत काडतूस जप्त करून आरोपी दिलीप मेथल्या मुझालदा यास अटक केली. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी ११ वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या बाबत माहिती अशी, की सोनाळा बस स्टॉपसमोरील हॉटेल मेघा येथे एक व्यक्ती चहा, नास्ता करण्यासाठी आला. त्याच्याजवळ दोन देशी बनावटीचे कट्टे व दोन काडतूस आसल्याची माहिती पोहेकॉ. श्याम कपले यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे ठाणेदार सचिनसिंग परदेशी, पोलीस उपनिरीक्षक सुनील बडगुजर, सहा.पोलीस उपनिरीक्षक गजानन सावंत, पोहेकॉ गजानन जोशी श्याम कपले, पोकॉ गजानन तायडे, निशीकांत कळसकार, भाऊसाहेब मोरे यांनी हॉटेल मेघा येथे धाव घेऊन मोठय़ा शिताफीने आरोपी दिलीप मैथल्या मुझालदा (वय २१) याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला कमरपट्ट्यामध्ये दोन देशी कट्टे व पँटच्या खिशात दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी आरोपी दिलीप मैथल्या मुझालदा यास अटक करून घटनास्थळाचा पंचनामा केला. पोकॉ. शाम कपले याच्या फिर्यादिवरून सोनाळा पोलीस स्टेशनला कलम ३, २५ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर आणि अपर पोलीस अधीक्षक यशवंत साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे. आरोपी दिलीप मुझालदा हा संग्रामपूर तालुक्यातील वसाडी येथील रहिवासी असून, त्याच्या जवळून जप्त करण्यात आलेल्या देशी कट्टय़ाची किंमत ४0 हजार रुपये असून, जिवंत काडतुसाची किंमत दोन हजार रूपये आहे.