शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तीन साखर कारखान्यांवर जप्ती

By admin | Updated: January 29, 2017 01:07 IST

सांगोल्याचा सांगोला सहकारी, अकलूजचा शंकर सहकारी व अक्कलकोटचा स्वामी समर्थ या तीन सहकारी साखर कारखान्यांकडील थकबाकीच्या वसुलीसाठी राज्य बँकेने

सोलापूर: सांगोल्याचा सांगोला सहकारी, अकलूजचा शंकर सहकारी व अक्कलकोटचा स्वामी समर्थ या तीन सहकारी साखर कारखान्यांकडील थकबाकीच्या वसुलीसाठी राज्य बँकेने जप्तीची कारवाई सुरू केली आहे़ या कारखान्यांचा रितसर ताबा देण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून, प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याची तयारीही केल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी सांगितले.सोलापूर जिल्ह्यातील थकबाकीमध्ये असलेल्या सर्वच सहकारी संस्थांची मालमत्ता विक्री करून, वसुली करण्याचा निर्धार त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला़ हे तिन्ही साखर कारखाने राज्य बँकेचे थकबाकीदार आहेत. सांगोला कारखान्याकडे राज्य बँकेचे ३६ कोटी, शंकरकडे ३९ कोटी व स्वामी समर्थकडे सुमारे ८ कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम वसूल होत नसल्याने, बँकेने मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावल्या होत्या. बाळे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला कागद कारखान्याकडे १७ कोटी इतकी थकबाकी असून, जागेवर काहीच शिल्लक ठेवले नाही. शिवाय रिकाम्या जागेवर अतिक्रमणही केले आहे. रिकाम्या जागेची विक्री करून रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय शारदा सहकारी सूतगिरणीकडे १९ कोटी, नान्नज येथील शरद सहकारी सूतगिरणीकडे १० कोटी, वैराग येथील संतनाथ सहकारी साखर कारखान्याकडे ३२ कोटी ६१ लाख इतकी थकबाकी आहे़ या वसुलीसाठी जप्तीची कारवाई अटळ असल्याचे त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)राज्य बँकेने दिले जिल्हाधिकाऱ्यांना पत्रया तीनही कारखान्यांच्या जप्तीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना कारखाना व्यवस्थापनाने दाद दिली नाही. यामुळे जप्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी रितसर कार्यवाही करावी व मालमत्ता ताब्यात द्यावी, यासाठी राज्य बँकेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनीही दखल घेतली नाही, तर न्यायालयात दाद मागणार आहोत, असे राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी सांगितले.