शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

दृश्यम चित्रपट पाहून सावकाराचा केला खून

By admin | Updated: January 7, 2017 00:57 IST

पैशावर जास्त व्याज मागून पैशासाठी तगादा लावत असल्याच्या कारणावरून सावकाराचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली

पिंपरी : पैशावर जास्त व्याज मागून पैशासाठी तगादा लावत असल्याच्या कारणावरून सावकाराचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी तीन महिने मृतदेह एका गोदामामध्ये पुरून ठेवला होता. यातील आरोपींना निगडी पोलिसांनी अटक केली असून ‘दृश्यम’ चित्रपट पाहून हा गुन्हा केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. श्रीराम शिवाजी वाळेकर (वय २७, रा. बालघरे वस्ती, कुदळवाडी, चिखली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मेहबूब समिदउल्ला मणियार (वय २६) याला अटक करण्यात आली असून, त्याचे वडील समिदुल्ला अकबरअली मणियार (वय ५४) यांना ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके म्हणाले, श्रीराम वाळेकर बेपत्ता असल्याबाबतची तक्रार २७ सप्टेंबरला त्यांचे वडील शिवाजी पाळेकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यानुसार तपास सुरु होता. दरम्यान, श्रीराम वाळेकर हे व्याजाने पैसे देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. व्याजाने पैसे घेणाऱ्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवून सखोल तपास केला असता समिदुल्ला मणियार यांनी श्रीराम वाळेकर यांच्याकडून वेळोवेळी व्याजाने पैसे घेत. या पैशावरून श्रीराम यांचे मेहबुब आणि समिदुल्ला यांच्यासोबत वाद होत असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पोलीस नाईक किरण खेडकर यांनी श्रीराम वाळेकर आणि संशयितांचे फोन क्रमांकाबाबतची तांत्रिक माहिती घेतली असता, त्यांचे एकमेकांशी बोलणे होऊन ते कुदळवाडी, मोशी भागात एकत्रित आल्याचे निष्पन्न झाले. मणियारबाबत संशय बळावल्याने तपास करीत असताना मेहबुब मणियार याने, वडील आणि श्रीराम यांच्यात वादविवाद होत असल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान, श्रीराम हे पैशावर जास्त व्याज मागून पैशासाठी तगादा लावत असल्याचे त्यांनी सांगितले. या कारणावरुन श्रीराम यांच्याबद्दल मनात राग धरून मेहबूब व समिदुल्ला यांनी कुदळवाडी येथील गोदामामध्ये श्रीराम यांना बोलावून घेतले. त्यानंतर श्रीराम यांच्या गळ्यावर चाकूने वार करून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी भाड्याने घेतलेल्या जागेत मृतदेह पुरण्यात आला. मोठा खड्डा खोदून प्लॅस्टिक बॅगमध्ये मृतदेह गुंडाळून खड्ड्यात ठेवण्यात आला. त्यानंतर त्यावर माती, कचरा टाकून मृतदेह पुरण्यात आल्याची माहितीही आरोपींनी दिली. (प्रतिनिधी)अशी सुचली कल्पना पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जमिनीत पुरण्याची कल्पना ‘दृष्यम्’ चित्रपटातून सुचल्याची कबुली आरोपींनी दिली. हा गुन्हा करण्याअगोदर ५ वेळा चित्रपट पाहिल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. >तीन महिन्यांपूर्वीच प्लॅनया गुन्ह्याचा कट गेल्या तीन महिन्यांपासून शिजत होता. यासाठी आरोपींनी तीन महिन्यांपूर्वीच चार गुंठ्यांची जागा भाड्याने घेतली होती. या जागेतच खड्डा खोदून मृतदेह पुरण्यात आला.