पंकज राऊत,बोईसर- औद्योगिक सुरक्षिततेबरोबरच घर, आॅफिस आणि व्यक्तिगत सुरक्षिततेला खूप महत्त्व प्राप्त झाल्याने तसेच पर्यावरण नियंत्रणासंदर्भातील अद्ययावत यंत्रसामग्री आणि त्याची माहिती एकाच छताखाली उपलब्ध व्हावी, हा मुख्य हेतू समोर ठेवून तारापूर येथे भव्य सेफ्टी, सिक्युरिटी आणि एनव्हायरो कंट्रोल एक्सपो-२०१७ चे आयोजन करण्यात आले आहे. इंडस्ट्रियल इन्फोटेकच्यावतीने आणि तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन व एमआयडीसी मार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तारापूर एमआयडीसीमधील टीमा ग्राउंडवर राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षितता सप्ताहाचे औचित्य साधून ४ ते ६ मार्च असे तीन दिवस सदर एक्सपोचे आयोजन करण्यात आले असून या एक्सपोचा मिडिया पार्टनर लोकमत आहे. या एक्सपोमध्ये ५० स्टॉल उभारण्यात आले असून त्यामध्ये फायर आणि लाइफ सेफ्टी सिस्टीम, व्हिडीओ सोल्युशन आणि क्लोज सर्किट टीव्ही, सेफ्टी लाइट आणि डिटेक्शन सिस्टीम, वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि इक्विपमेंट, सेफ्टी केमिकल्स, पर्सनल लाइफ सेफ्टी, आयटी आणि सायबर सिक्युरिटी, इंडस्ट्रियल सेफ्टी इक्विपमेंट इत्यादीबाबत अनेक नवनवीन यंत्रसामग्री आणि वस्तूंचे प्रदर्शन व विक्र ी तसेच नवनवीन तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या एक्सपोमध्ये प्रोलाइट आॅटोग्लो लि, एस.व्ही. मशीन टूल्स, अहुरा एक्वा ट्रीट, आॅटोलाइट इमर्जन्सी लाइट, वसू केमिकल्स, एक्वा ट्रीट, सीपी प्लस, ग्रीन फिल्ड इंजिनीअरिंग, एनव्हायरो अॅनालिस्ट अॅण्ड इंजिनीअरिंग प्रा.लि., गोल्डफिंच इंजिनीअरिंग सिस्टीम प्रा.लि., सादेकार एनव्हायरो इंजिनीअरिंग प्रा.लि., केईपी इंजिनीअरिंग सर्व्हिसेस प्रा.लि. इ. नामवंत कंपन्यांचा समावेश आहे. एक्सपोचे उद्घाटन टीमाचे अध्यक्ष डी.के. राऊत यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता करण्यात येणार आहे.
तारापूरला आजपासून ‘सिक्युरिटी एक्सपो-२०१७’
By admin | Updated: March 4, 2017 03:21 IST