शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

रस्ते घोटाळा चौकशीची दुसरी फेरी मंदावली

By admin | Updated: July 15, 2016 20:30 IST

रस्ते दुरुस्ती चौकशीच्या पहिल्या फेरीतच मोठा घोटाळा उघड झाल्यामुळे दुसरी फेरी तात्काळ सुरु करण्यात आली़

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 15 -रस्ते दुरुस्ती चौकशीच्या पहिल्या फेरीतच मोठा घोटाळा उघड झाल्यामुळे दुसरी फेरी तात्काळ सुरु करण्यात आली़ मात्र अधिकाऱ्यांचे निलंबन व अटक, अभियंत्यांमध्ये रोष अशा सर्व घटनानंतर चौकशीची दुसरी फेरी थंडावली आहे़ आणखी अभियंत्यांचे निलंबन केल्यास अभियंतावर्गात असंतोष वाढून रस्ते विभागाचा कारभार ऐन पावसाळ्यात कोलमडेल, अशी भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटत आहे़ त्यामुळे पोलिसांमार्फत सुरु असलेली चौकशी पूर्ण होईपर्यंत पालिकेची चौकशी संथगतीने सुरु आहे़मुंबईतील ३४ रस्त्यांच्या कामांची सहा महिने चौकशी केल्यानंतर एप्रिल महिन्यांत अहवाल सादर करण्यात आला़ रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे या चौकशीतून उघड झाले होते़ याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यामुळे रस्ते विभागाचे तत्कालिन प्रमुख अभियंता अशोक पवार आणि दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता उदय मुरुडकर यांना निलंबित करण्यात आले़ तसेच आणखी २२६ रस्त्यांच्या कामाची चौकशी तात्काळ सुरु करण्यात आली़मात्र दोन अभियंत्यांच्या अटकेमुळे अभियंतावर्गात रोष पसरला असून २० जुलै रोजी आंदोलनाचा इशारा अभियंत्यांच्या कृती समितीने दिला आहे़ यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणणाले आहेत़ पावसाळ्यात रस्ते दुरुस्ती तातडीने करुन घेण्याची गरज आहे़ त्यातच रस्ते विभागात मनुष्यबळ कमी असल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे़ त्यामुळे चौकशी दुसऱ्या फेरी गेले महिनाभर जैसे थेच असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले़ प्रतिनिधीचौकटदुसऱ्या अहवालाच्या प्रतीक्षेत* दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता एसक़ोरी यांच्या अध्यक्षतेखाली २२६ रस्त्यांची चौकशी सुरु आहे़ पहिला चौकशीचा अहवाल सादर केल्यानंतर दुसरी फेरी तात्काळ सुरु झाली़ त्यानुसार रस्त्यांची पाहणीही करण्यात आली़ मात्र अद्याप अहवाल सादर झालेला नाही़ दक्षता खात्याला याबाबत वारंवार सुचना करुनही अहवाल सादर करण्यात आलेला नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले़पहिल्या फेरीत ३५२ कोटींचा घोटाळारस्त्यांच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याने कामाच्या गुणवत्तेवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे़ ही सार्वजनिक पैशांची नासाडी असून निकृष्ट दर्जाच्या कामासाठी जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस चौकशी समितीने पहिल्या फेरीच्या अहवालातून केली होती़ सुमारे ३५२ कोटी रुपयांचा हा घोटाळा होता़यांच्यावर झाली कारवाईरस्ते विभागाचे प्रमुख अभियंता अशोक पवार आणि दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता उदय मुरुडकर यांचे निलंबन व अटक, थार्डपार्टी आॅडिट कंपनीच्या २२ अभियंत्यांना अटक, के़आऱ कन्स्ट्रक्शन, महावीर इन्फ्रा, आरपीएस, आऱ के़ मदानी, जे़ कुमार, रेलकॉन या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकाणे, नोंदणी रद्द करणे व त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्याची प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली आहे़ यापैकी आतापर्यंत तीन ठेकेदारांना अटक झाली आहे़टप्याटप्याने होणार कारवाईया कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याने रस्ते व दक्षता विभागातील अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागणार आहे़ मात्र एकाचवेळी अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई शक्य नसल्यामुळे सर्वप्रथम वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे़ त्यानंतर इतर अधिकाऱ्यांची या घोटाळ्यातील जबाबदारी निश्चित करुन त्यांच्यावर दोषारोपपत्र ठेवण्यात येणार आहे़