पुणो : घटस्फोट न घेता दुसरे लगA करणा:या आयुव्रेद डॉक्टरला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. सरदार यांनी 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली, तर माहेराहून पैसे आणावेत यासाठी डॉक्टर असणा:या पहिल्या पत्नीचा छळ केल्याप्रकरणीही पतीला दोषी धरून एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली. या दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या असल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.
डॉ. संजय वसंतराव शितोळे (वय 38, रा. खडकी रावणगाव, ता. दौंड) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी त्याच्या 34 वर्षीय डॉक्टर सविता (रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सरकारी वकील अॅड संध्या काळे यांनी 7 साक्षीदार तपासले. डॉ. संजय व डॉ. सविता यांचा 4 फेब्रुवारी 1999 रोजी विवाह झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी संजयने दारू पिऊन सविता यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. (प्रतिनिधी)
4 दवाखाना सुरू करण्यासाठी माहेराहून पैसे आणावेत यासाठी शारीरिक, मानसिक छळ करू लागले. त्यानंतर सविता यांनी माहेराहून 2क् हजार रुपये आणले, तरीही संजय याने त्रस देण्यास कमी केले नाही. त्यामुळे त्या माहेरी निघून गेल्या. तेथून त्रस न देण्याच्या हमीवर संजयने सविता यांना घरी आणले होते.