मुंबई : दहावी बोर्डाच्या विक्रमी निकालाचे पडसाद यंदा अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या मेरिट लिस्टवर दिसून येत आहेत. मंगळवारी जाहीर झालेल्या अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये कट आॅफने नव्वदी पार केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत कट आॅफची टक्केवारी यंदा चार ते पाच टक्क्यांनी वाढली आहे.दुसऱ्या यादीनंतर ४४ हजार १२३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. त्यानुसार १0 हजार ४६४ नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला असून, बेटरमेंटचा पर्याय ३३ हजार ६५९ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. पहिल्या पसंतीचे कॉलेज दुसऱ्या यादीतील ६९२ विद्यार्थ्यांना मिळाले आहे. आतापर्यंत २ लाख ३२ हजार २८१ जागांवरील प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. महाविद्यालयांची कट आॅफ लिस्टपोद्दार कॉलेजवाणिज्य -९१.८०%केळकर कॉलेजकला-७९.४०%वाणिज्य -८९.८०%विज्ञान -९२.८०%एनएम कॉलेजवाणिज्य -९२.४०%रुईया कॉलेजकला -९०.८०%विज्ञान -९२.८०%साठ्ये कॉलेजकला- ४८%वाणिज्य -८८.२०%विज्ञान- ९३.१७%बिर्ला कॉलेजवाणिज्य- ८६.४०%विज्ञान -९१.८०%खालसा कॉलेजकला -५६.७१%वाणिज्य - ८५.८०%विज्ञान -८५.६०%झुनझुनवाला कॉलेजवाणिज्य -८६.६०%कला -३६%विज्ञान - ८९.४०%सोमैया विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयसायन्स -९० %कॉमर्स - ८८ %केजे सोमैया कला व वाणिज्य महाविद्यालयआटर््स- ६५.८३ %कॉमर्स -७३.३३%
दुसऱ्या यादीचीही ‘कट आॅफ’ नव्वदी पार
By admin | Updated: July 1, 2015 00:30 IST