शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये विद्यापीठात प्रेमप्रकरणातून विद्यार्थ्याची आत्महत्या, महिनाभरातील दुसरी घटना  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 15:54 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात गणेश  शंकरराव कोपरवाड (23) या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांना त्याने लिहलेली सुसाईड नोट सापडली असून  त्याने प्रेमप्रकरणातून  आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे.  

औरंगाबाद, दि, 12 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात गणेश  शंकरराव कोपरवाड (23) या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गणेश हा विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागात प्रथमवर्षात शिक्षण घेत होता. पोलिसांना त्याने लिहलेली सुसाईड नोट सापडली असून  त्याने प्रेमप्रकरणातून  आत्महत्या केल्याची माहिती दिली आहे.  प्रेमप्रकरणातून आत्महत्येची याच वसतिगृहातील हि महिनाभरात दुसरी घटना घडल्याने विद्यापीठात खळबळ उडाली आहे.  

याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठातील वसतिगृह क्रमांक 1 च्या खोली क्रमांक 98 मध्ये गणेश वास्तव्यास होता. गणेशचे रुममेट सकाळी नेहमीप्रमाणे लेक्चरसाठी आपाआपल्या विभागात गेली तर गणेश रूमवरच थांबला होता. दुपारी १ च्या दरम्यान त्याचे रुममेट वसतिगृहात आले असता त्यांना रूमचा दरवाजा बंद दिसला. दाराच्या फटीमधून त्यांनी पाहिले असता गणेश याने गळफास घेतलेले दिसले. तेव्हा इतर मित्रांच्या मदतीने त्यांनी दरवाजा रूमचा दरवाजा तोडला. यानंतर त्याला घाटी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. 

पोलिसांना गणेश याने लिहलेली सूसाइड नोट मिळाली असून त्या दृष्टीने त्यांचा तपास सुरु आहे. प्रेमप्रकरणातून गणेश ने आत्महत्या केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गणेश याच्या फेसबुकवर शेवटची पोस्ट ' आय हेट गर्ल्स 'अशी होती. याच वसतिगृहात मागील महिन्यात 29 तारखेला अमोल काकडे या विद्यार्थ्याने प्रेमप्रकरणातूनच आत्महत्या केली होती.