शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

दुस-या, चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी

By admin | Updated: February 24, 2015 04:35 IST

देशभरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांसह काही प्रमुख खासगी व नागरी सहकारी बँका यापुढे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी पूर्ण दिवस बंद राहणार असून, इतर शनिवारी पूर्ण दिवस सुरू राहणार आहेत.

मुंबई : देशभरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांसह काही प्रमुख खासगी व नागरी सहकारी बँका यापुढे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी पूर्ण दिवस बंद राहणार असून, इतर शनिवारी पूर्ण दिवस सुरू राहणार आहेत. ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ (आयबीए) ही बँकांची संघटना आणि बँकांमधील आठ लाखांहून अधिक कर्मचारी व अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नऊ देशव्यापी संघटना यांच्यात सोमवारी मुंबईत वेतनवाढीचा नवा करार झाला त्यात हा निर्णय झाला.या करारानुसार बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात सरासरी १५ टक्के वाढ होईल. वाढीव वेतन १ नोव्हेंबर २०१२पासूनच्या पूर्वलक्षी परिणामाने लागू होईल. याचा बँकांवर वर्षाला ४,७२५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल. या वेतनवाढीचा किती हिस्सा अधिकारीवर्गाला व किती कर्मचाऱ्यांना द्यायचा हे ३१ मार्च २०१२ अखेरच्या प्रशासन खर्चाची विगतवारी करून स्वतंत्रपणे ठरविण्यात येईल, असे वाटाघाटींच्या अधिकृत इतिवृत्तामध्ये नमूद केले गेले आहे. बैठकीत झालेल्या उभयपक्षी सहमतीनुसार नोव्हेंबर २०११पर्यंतचा ४,४४० अंशांचा (६०.१५ टक्के) महागाईभत्ता मूळ वेतनात समाविष्ट करून व त्यावर ३१ मार्च २०१२पर्यंतच्या काळासाठीचा दोन टक्के ‘लोड फॅक्टर’ जमा करून नंतर नव्या वेतनश्रेणींची आखणी केली जाईल. यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष वेतनवाढीखेरीज आणखी ५९७ कोटी रुपयांचा लाभ होईल. सदस्य बँका आणि त्यांच्या कर्मचारी संघटना यांच्यात प्रलंबित असलेल्या ज्या इतर बाबींवर या वाटाघाटींमध्ये चर्चा झाली त्या त्यांच्या पातळीवर उभयतांचे समाधान होईल अशा रितीने सोडविल्या जातील. तसेच दोन्ही पक्षांनी उभयतांना सोईस्कर अशा दिवशी पुन्हा भेटून पुढील ९० दिवसांत विविध विषयांसंबंधीचा सविस्तर समझोता तयार करावा, असेही ‘आयबीए’च्या कफ परेड येथील कार्यालयात झालेल्या वाटाघाटींमध्ये ठरले. आॅल इंडिया बँक आॅफिसर्स कॉन्फेडरेशन, आॅल इंडिया बँक आॅफिसर्स असोसिएशनसह नऊ संघटनांच्या प्रतिनिधींनी या वाटाघाटींमध्ये भाग घेतला. (विशेष प्रतिनिधी)