शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दुस-या दिवशीही राज्यभरात शेतमालाची नासाडी ( फोटो स्टोरी)

By admin | Updated: June 2, 2017 11:06 IST

शेतकरी संपाच्या दुस-या दिवशीही राज्याच्या विविध भागात शेतीमालाची नासाडी सुरु आहे. आक्रमक झालेले आंदोलक कुठे रस्त्यावर दूध ओतून देत आहेत

ऑनलाइन लोकमत 

शेतकरी संपाच्या दुस-या दिवशीही राज्याच्या विविध भागात शेतीमालाची नासाडी सुरु आहे. आक्रमक झालेले आंदोलक कुठे रस्त्यावर दूध ओतून देत आहेत तर, कुठे भाजीपाला रस्त्यावर फेकला जात आहे. काल पहिल्या दिवशी मुंबईसह अन्य शहरांना या संपाची विशेष झळ जाणवली नव्हती. पण आज मात्र दूध आणि भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. मुंबई, ठाण्याला फळभाज्यांचा पुरवठा करणा-या नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये गाडयांची आवक घटली आहे. दररोज 500 ट्रक भरुन फळभाज्या एपीएमसी मार्केटमध्ये येतात पण आज फक्त 180 गाडया आल्या. यात 49 ट्रक आणि 131 टेम्पो आहेत. ठाणे आणि कल्याणमध्ये भाजीपाल्याची एकही गाडी आलेली नाही.
जाणून घ्या कुठे काय चालू आहे
नवीमुंबई एपीएमसी भाजी मार्केटमध्ये गुजरात, कलकत्ता, दिल्ली, मध्यप्रदेश येथून भाज्या आल्या.
 
धुळयात शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे शुक्रवारी आठवडे बाजार न भरविता कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
अहमदनगरच्या राहुरी बाजार समितीमध्ये शुकशुकाट, संपाच्या दुस-या दिवशी गावे बंद, रास्ता रोको करण्यासाठी हालचाली सुरु, आठवडी बाजार बंद.
हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथे शेतकरी आज संपात सहभागी झाले, दूध व भाजीपाला रस्त्यावर ओतला.
 
 
 
यवतमाळ - महागाव तालुक्यातील हिवरासंगम येथे शेतक-यांचा असंतोष दुध व भाजीपाला फेकला रस्त्यावर.
नाशिक– शेतकरी संपाच्या दुस-या दिवशी धुळगाव येथे मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला, शेतकरी संघटना नेते संतु पा झांबरे यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांचे आंदोलन दुस-या दिवशीही कायम.
दूर शिंगोटे( सिन्नर) येथे बायपास जवळ नारळ,आंबे,टोमॅटो घेवून जात असताना तीन मालट्रक शेतकऱ्यांनी अडवले.
सोलापूर - वाखरी (तालुका पंढरपूर) मुख्यमंत्र्याच्या पुतळयास दुधाचा अभिषेक आणि जोडो मार आंदोलन.
 परभणी शहरातील विद्यापीठ गेट परिसरात दररोज भरणारा भाजीपाला विक्री बाजार आज कडकडीत बंद.
यवतमाळ उमरखेड तालुक्यातील मरसुळ फाट्यावर आज अमुल दुध संकलन केंद्राचे वाहने आडवून शेतकऱ्यांनी सर्व दुध रस्त्यावर सांडून दिले शेतकरी संपला उदंड प्रतिसाद.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकी मार्केटयार्डमधे भाजीपाल्याची फक्त १० टक्के आवक