शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदार ट्रस्टला सेबीने फटकारले, ‘पॅनकार्ड’ प्रकरणी परताव्यासाठी अर्ज मागवलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 05:26 IST

पॅनकार्ड क्लबच्या फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांकडून परताव्यासाठी दाव्याचे कुठलेही अर्ज मागविलेले नाहीत. कुठल्याही संस्थेची यासाठी नियुक्ती केलेली नाही, असे ‘सेबी’ने स्पष्ट केले आहे.

मुंबई  - पॅनकार्ड क्लबच्या फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांकडून परताव्यासाठी दाव्याचे कुठलेही अर्ज मागविलेले नाहीत. कुठल्याही संस्थेची यासाठी नियुक्ती केलेली नाही, असे ‘सेबी’ने स्पष्ट केले आहे. तसेच गुंतवणूकदारांकडून असे अर्ज मागविल्याबद्दल गुंतवणूकदार कृती चॅरिटेबल ट्रस्टलाही ‘सेबी’ने फटकारले आहे.‘पॅनकार्ड क्लब’ या कंपनीने विविध बनावट कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील ३५ लाखांसह संपूर्ण देशातील ५० लाख गुंतवणूकदारांकडून ७,०३५ कोटी रुपये जमा केले. त्या बदल्यात आलिशान रिसॉर्टमध्ये राहण्याची सोय व आकर्षक परताव्याचे आमिष दाखविण्यात आले. २०१४मध्ये हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर ‘सेबी’ने क्लबच्या ८४ मालमत्ता जप्त केल्या. त्यांची लिलाव प्रक्रिया सुरू आहे. ही रक्कम गुंतवणूकदारांना परत मिळावी, अशी चॅरिटेबल ट्रस्टची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी गुंतवणूकदारांकडून अर्ज लिहून घेण्यास सुरुवात केली. १४ मार्च २०१८ला ‘सेबी’च्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र ‘सेबी’ने या ट्रस्टलाच दोषी ठरवले....म्हणून आमच्यावर दबाव आणलाट्रस्टचे संयोजक विश्वास उटगी यांनी ‘सेबी’चा निषेध केला. गुंतवणूकदारांच्या पैशांमधून पॅनकार्ड क्लबने उभी केलेली संपत्ती ‘सेबी’ने जप्त केली आहे. ‘सेबी’ ही नियामक संस्था असल्याने गुंतवणूकदारांचे पालक या नात्याने लोकशाही पद्धतीने संरक्षण करणे अपेक्षित आहे. गुंतवणूकदारांना एकत्र करण्याचे काम ट्रस्टने केले. पण गुंतवणूकदारांत काही सत्ताधारी लोकप्रतिनिधींचे समर्थक आहेत. त्यांना ट्रस्टचे काम रुचले नाही, म्हणून ‘सेबी’वर दबाव आणला.

टॅग्स :Mumbaiमुंबईnewsबातम्या