शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कंपन्यांचे ७० टक्के बियाणे बाजारात

By admin | Updated: May 18, 2017 02:04 IST

महाबीज, एनएससी बियाणे पुरवठ्याची गती संथ

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पाऊस नेहमीपेक्षा लवकर धडकण्याची शक्यता असतानाच शेतकऱ्यांना वाजवी भावात बियाणे पुरवठा करणारे महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून बियाणे पुरवठ्याची गती मंदावलेली आहे. त्याचवेळी खासगी कंपन्यांनी मागणीच्या तब्बल ७० टक्के बियाण्यांचा पुरवठा बाजारात केला आहे. त्याचवेळी महामंडळाचे तूर, मूग, उडीद बियाणे तर बाजारात पोचलेच नाही. त्यामुळे पेरणी साधण्याची संधी शोधणाऱ्या शेतकऱ्यांना ऐनवेळी अधिक दराने खासगी कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.कृषी विभागाने खरीप हंगाम २०१७-१८ साठी शासनाकडे बियाण्यांची मागणी केली आहे. त्यानुसार बियाणे पुरवठ्याचा कालावधीही ठरला आहे. दरम्यान, पाऊस लवकरच धडकणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांची पेरणीची वेळ साधण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे मिळण्यासाठी बाजारात मुबलक साठा असणे आवश्यक आहे. मागणीनुसार महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, खासगी कंपन्यांनी बाजारात बियाणे पुरवठ्याला सुरुवात केली आहे. मात्र, त्यामध्ये खासगी कंपन्यांनी शासनाच्या दोन्ही महामंडळांना कमालीचे मागे टाकले आहे. त्यामुळे बाजारात सध्यातरी खासगी कंपन्यांचे महागडे बियाणे खरेदी करण्याचा पर्याय शेतकऱ्यांपुढे आहे. त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होणार आहे. सोयाबीन पुरवठ्यातही खासगी कंपन्या पुढेमहामंडळाचे बियाणे तुलनेने स्वस्त मिळते. मोठ्या प्रमाणात शेतकरी ते बियाणे घेतात. बाजारात सध्या खासगी कंपन्यांचे बियाणे मुबलक प्रमाणात आहे. सोयाबीन बियाण्याचा तर कंपन्यांनी बाजारात ८६ टक्के पुरवठा केला आहे. तर दोन्ही महामंडळाचा पुरवठा ५० टक्क्यांच्या आत आहे. खासगी कंपन्यांनी त्यांना मागणी केलेल्या २६९९० क्विंटलपैकी २३४५० क्विंटलचा पुरवठा केला. महामंडळांनी ४० हजार क्विंटल मागणीच्या तुलनेत १९५०० क्विंटल एवढा पुरवठा केला आहे. खपात महामंडळाचे सोयाबीन बियाणे पुढेवाजवी किमतीत असल्याने महामंडळाच्या बियाण्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. आतापर्यंत बाजारातून विक्री झालेल्या बियाण्यांत महामंडळाचे सोयाबीन ५११५ क्विंटल, तर खासगी कंपन्यांच्या २५६० क्विंटलची नोंद झाली आहे. यावरून शेतकऱ्यांचा कल महामंडळाच्या बियाण्यांकडेच अधिक असल्याचे दिसत आहे. महामंडळाचे ४३ टक्केच बियाणे पोचले!कृषी विभागाच्या मागणीप्रमाणे महाबीज आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून सर्व प्रकारच्या बियाण्यांचा एकूण ४६ हजार ४० क्विंटल पुरवठा होणे आवश्यक आहे. त्या तुलनेत या दोन्ही महामंडळांकडून १५ मे अखेरपर्यंत २० हजार ६० क्विंटल बियाणे पुरवठा झाला आहे. त्यामध्ये सोयाबीनच १९५०० क्विंटल आहे. जिल्ह्यातील पीक पॅटर्न पाहता इतर आवश्यक बियाण्यांचा पुरवठा अद्यापही झालेला नाही. तूर, मूग, उडिदाचे बियाणेही बाजारात आलेले नाही. त्यामुळे आधीच बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना महामंडळांच्या बियाण्यांची प्रतीक्षा आहे.