शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

मासेमारीवर अनिश्चिततेचे सावट, कोरोनामुळे यंदाचा हंगामही गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 01:49 IST

मुंबई शहर व उपनगरांत होणाºया मासेमारीचा विचार केल्यास येथे साधारण चार हजार ५०० बोटी आहेत. त्यात ट्रॉलर, गिलनेट, डोलनेट पर्सीन व इतर लहानमोठ्या मच्छीमार बोटींचा समावेश आहे

नारळी पौर्णिमेनंतरचा मासेमारीचा हंगाम, मच्छीमारांना दोन पैसे मिळवून देतो. परंतु, गेल्या वर्षी ‘न भूतो न भविष्यति’ अशा नैसर्गिक आपत्तींना मच्छीमारांना तोंड द्यावे लागले. दहा महिने चालणारी मासेमारी जेमतेम पाच महिने झाली. आता १ आॅगस्टपासून पुन्हा एकदा मासेमारीला सुरुवात करायची, तर कोरोनाचा प्रभाव अजूनही ओसरलेला नाही. त्याचा परिणाम देशांतर्गत व परदेशांत निर्यात होणाऱ्या मासळीच्या किमतीवर होण्याची चिन्हे आहेत.

मुंबई शहर व उपनगरांत होणाºया मासेमारीचा विचार केल्यास येथे साधारण चार हजार ५०० बोटी आहेत. त्यात ट्रॉलर, गिलनेट, डोलनेट पर्सीन व इतर लहानमोठ्या मच्छीमार बोटींचा समावेश आहे. येथे येणारा खलाशी बहुतेक गुजरात, उत्तर प्रदेश व इतर जिल्ह्यांतून येतो. त्यांनी आरोग्याबाबत घ्यायच्या खबरदारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या सूचना पाळाव्या लागतील. मुंबईतील ससून डॉक व भाऊचा धक्का ही सर्वात मोठी मासळी लँडिंग सेंटर आहेत. साधारण ३०००च्या आसपास बोटींची नोंद या दोन ठिकाणांहून होते. जास्तीत जास्त गिºहाईक आल्यास मासळीला जास्त भाव मिळतो, हा अनुभव आहे. परंतु, कोरोनाच्या संकटात गिºहाइकांच्या संख्येवर निर्बंध लादले जाऊ शकतात, अशी भीती आहे.मासेमारी सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी व मत्स्य व्यवसाय खाते यांनी दिलेल्या नियमावलीचे पालन करावे, तर मासेमारी व्यवसाय होऊच शकत नाही, अशी भावना मच्छीमारांची आहे. मासळी निर्यातीचा विचार केल्यास, भारतातून जास्तीत जास्त मासळी चीनमध्ये निर्यात केली जाते. परंतु, काही दिवसांपासून भारताच्या सीमेवरील सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे चीनने पाकिस्तान व बांगलादेश यांना करसवलत देऊन झुकते माप दिले आहे. त्यामुळे भारतीय मासळीला पाकिस्तान व बांगलादेश यांच्या स्पर्धेला तोंड देणे जड जाईल. परिणामी, निर्यातयोग्य मासळीचे भाव गडगडतील, ही भीती मच्छीमारांना आहे.दुसरीकडे मुंबईतील मासळी बाजार अजून बंद आहेत. मुंबईची जीवनवाहिनी ट्रेन, सर्वसामान्य लोकांसाठी सुरू झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज मंडई काही दिवसांपूर्वी सुरू केली होती. परंतु, तेथे कोरोना रुग्ण आढळून आल्याने पुन्हा बंद करण्यात आली. अशीच परिस्थिती मुंबईच्या इतर मासळी मंडयांत उद्भवल्यास मासळीच्या विक्रीवर परिणाम होईल. अशा नैसर्गिक संकटात, डिझेलमध्ये झालेल्या दरवाढीमुळे मच्छीमारांचे कंबरडे मोडले आहे. मुंबईत जास्त संख्येने असलेल्या ट्रॉलर बोटींचा विचार केल्यास, साधारण एका फिशिंग ट्रीपसाठी (१० ते १५ दिवस) एका बोटीला २००० ते २५०० लीटर डिझेल लागते. लॉकडाऊनपासून ते आजपर्यंत, चार महिन्यांत साधारण १८ ते २० रुपये डिझेल भाववाढ झाली, म्हणजे प्रत्येक ट्रीपसाठी मच्छीमारांना ३५ ते ५० हजार रुपये जादा मोजावे लागतील. याचा आर्थिक मेळ कसा बसवायचा, ही चिंता त्यांना भेडसावत आहे. डिझेल विक्रीकर परतावा मिळण्यात होणारी दिरंगाई, त्यामुळे व्यवसायासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे व व्यवसाय कसा टिकवून ठेवावा, या विवंचनेत सध्या मच्छीमार समाज आहे.कोरोनामुळे निर्माण झालेल्या अडचणीने गुजरात राज्यातील मच्छीमारांनी १ सप्टेंबरपासून मच्छीमारी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारकडेच मागणी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांनी १५ आॅगस्टपासून मासेमारीला जाण्याबाबतचा निर्णय घेतला. मुंबईतील मच्छीमार १ आॅगस्टपासून मासेमारीला सुरुवात करण्याच्या निर्णयाबाबत अजून संभ्रमात आहेत.नियोजित वेळेत मासेमारी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एमपीईडीए, वाणिज्य यांच्या मार्गदर्शनाखाली मासळी निर्यातीत असलेल्या कंपनीबरोबर चर्चा करून योग्य निर्णय घेतले, मच्छीमारांना भांडवलाची चणचण भासू नये म्हणून किसानकार्ड तत्सम योजना राबवून थकित परतावे दिले, तरच मच्छीमारीसंदर्भातील अडचणी काही अंशी दूर होतील.गेल्या वर्षी एकापाठोपाठ एक वादळे आली आणि संपूर्ण मासेमारी हंगामावर पाणी फिरले. यातून कसेबसे सावरायचे तर यंदा कोरोनाचे संकट उभे ठाकले. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर १ आॅगस्टपासून मासेमारीला सुरुवात करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, लॉकडाऊन, त्यासंदर्भातील नियमांचे पालन आणि मासळी निर्यातीवर होणारे परिणाम अशा अनेक समस्यांच्या जाळ्यात मच्छीमार गुरफटत चालले आहेत. आर्थिक अडचणींचे ढग आणि मत्स्य व्यवसायातील अनिश्चिततेच्या सावटात त्यांच्या उदरनिर्वाहाची बोट हेलकावे खाऊ लागली आहे.

(लेखक राष्टÑवादी काँग्रेसच्या मुंबई विभागाच्या मच्छीमार सेलचे अध्यक्ष आहेत. )

टॅग्स :Mumbaiमुंबईfishermanमच्छीमार