राजकुमार जोंधळे लातूर : जिल्ह्यातून ३०० मुली बेपत्ता झाल्याचा विषय थेट विधिमंडळापर्यंत पोहोचला असला तरी पोलीस दफ्तरी असलेल्या नोंदींमधून वेगळे वास्तव समोर आले आहे. गेल्या अडीच वर्षांत हरवलेल्या १८० मुलींपैकी १४३ मुलींचा शोध पोलीस पथकांनी घेतला व त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्या़ अद्याप ३७ मुलींचा शोध मात्र लागलेला नाही़वेगवेगळ्या कारणांमुळे मुलगी घर सोडून निघून जाणे, तिचे अपहरण होणे, आमिष दाखवून पळवून नेणे अशा घटनांच्या नोंदी जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठाण्यांमध्ये आहेत़ महिनाभरापूर्वी शहरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा तासगाव तालुक्यात सावर्डी येथील एका ३२ वर्षीय मुलाशी विवाह लावून दिल्याची घटना समोर आली़ त्या प्रकरणात अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.हा धागा पकडून जिल्ह्यातून ३०० मुली बेपत्ता झाल्याचा विषय विधिमंडळापर्यंत पोहोचला़
लातूरमधील बेपत्ता ३७ मुलींचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 04:01 IST