शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वनजमिनींचा शोध सुरू, प्रधान वनसचिवांची ताकिद, वनजमिनीची रेकॉर्ड तपासणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 15:41 IST

राज्यातील महसूल जमीन संपत आल्याने वनक्षेत्रावरील अतिक्रमण लक्षात घेता वनविभागाने वनजमिनीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने महसूलकडून मिळालेली जमीन ही वनविभागाच्या रेकॉर्डवर आणि प्रत्यक्ष जमीन किती? याचा शोध सुरू झाला आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देवनजमिनीच्या मोबदल्यात दुप्पट जमीन वनविभागाला देणे क्रमप्राप्त रेकॉर्डवर हजारो हेक्टर जमीन असताना गेली कोठे? याचा शोध सुरू राज्यात सुमारे साडेआठ लाख हेक्टर वनजमिनींची नोंदच नाहीमहसूल आणि वनविभागात ताळमेळ नाही

गणेश वासनिकअमरावती : राज्यातील महसूल जमीन संपत आल्याने वनक्षेत्रावरील अतिक्रमण लक्षात घेता वनविभागाने वनजमिनीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने महसूलकडून मिळालेली जमीन ही वनविभागाच्या रेकॉर्डवर आणि प्रत्यक्ष जमीन किती? याचा शोध सुरू झाला आहे.विविध कारणाने वनविभागाची गेलेल्या वनजमिनीच्या मोबदल्यात दुप्पट जमीन वनविभागाला देणे क्रमप्राप्त आहे. गत २५ वर्षांपूर्वी वनविभागाला मिळालेली हजारो हेक्टर जमीन अद्यापही रेकॉर्डवर असताना ही जमीन गेली कोठे? याचा शोध वनविभागाने सुरू केला आहे.

महसूल विभागाने दिलेली जमीन कागदोपत्री ताब्यात देण्यात आली असली तरी तुकड्या-तुकड्यांमध्ये जमिनी प्रत्यक्षात वनविभागाच्या राजपत्रानुसार राखीव वन म्हणून घोषित न झाल्यामुळे तलाठ्याच्या दफ्तरी अशा जमिनीची नोंद सरकारी जमीन अशी आहे. त्यामुळे या जमिनीचा ताबा कुणाचा? याबाबत तर्क लावणे कठीण झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल जमीन वनविभागाला दिल्यानंतर त्या जमिनीला सांवैधानिकरीत्या वनाचा दर्जा देऊन राजपत्रात समाविष्ट केले जाते. त्यानंतर तेथे वनविभागाला त्यांच्या कायद्याची रीतसर अंमलबजावणी करणे शक्य होते.

मात्र, राज्यात अनेक ठिकाणी वनजमिनीला राखीव वनाचा दर्जा न मिळाल्यामुळे अशी किती हेक्टर वनजमिनी सरकारी दफ्तरी केवळ जमीन म्हणून नोंद आहे, अशा वनविभागाच्या जमिनीचा शोध घेण्याचे निर्देश राज्याचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी वनाधिकाऱ्यांना दिल्याने या वनजमिनींचा शोधाशोध सुरू आहे. राज्यात सुमारे साडेआठ लाख हेक्टर वनजमिनींची नोंद नसल्याची माहिती समोर आली आहे.महसूल आणि वनविभागात ताळमेळ नाहीराज्य शासनाने त्यांच्या लेखी व निर्णयामध्ये महसूल व वनविभाग असे वाक्य लावून हे दोन्ही विभाग संयुक्त असल्याचे निर्देशित केले असले तरी राज्यातील वनविभाग व महसूल विभागात ताळमेळ नाही. महसूल विभागाने वनविभागाला दिलेल्या जमिनीचे ७/१२ देणे क्रमप्राप्त आहे. मात्र ते मिळालेले नाहीत.

गावठान जमिनीवर अतिक्रमण वाढले असल्याने महसुली जमिनीचा पुरता बोजवारा उडाला आहे. वनविभागाला कागदोपत्री दिलेल्या वन जमिनीवर अतिक्रमण असताना अशा जमिनी कागदोपत्री आदान-प्रदान झाल्याचे दिसून येते. वनजमिनीवर झालेले अतिक्रमण काढताना कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण होत असल्याने वनविभाग घायाळ झाला आहे. 

महसूलच्या ताब्यात असलेल्या वनजमिनी परत घेण्यासंदर्भात गतवर्षीच शासन निर्णय निर्गमित झाला आहे. मात्र, या निर्णयाची त्वरेने अंमलबजावणी झाली नसल्याने पुन्हा नव्या पत्राद्वारे वनजमिनीचा शोध घेऊन त्या वनविभागाला परत करण्याचे आदेशित केले आहे.- विकास खारगे,प्रधान मुख्य वनसचिव, महाराष्ट्र

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभाग