शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मेपल कंपनीवरून गदारोळ

By admin | Updated: April 21, 2016 00:59 IST

पाच लाखांत घर देण्याचे आमिष दाखवणाऱ्या मेपल कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करीत महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी तहकूब करण्यात आली

पुणे : पाच लाखांत घर देण्याचे आमिष दाखवणाऱ्या मेपल कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करीत महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी तहकूब करण्यात आली. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी या वेळी भारतीय जनता पक्षावर टीकेचे आसूड ओढत पुणेकरांची फसवणूक करणाऱ्यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. भाजपाच्या सदस्यांनी त्याचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला, मात्र गटनेते गणेश बिडकर अनुपस्थित असल्याने तो फारसा यशस्वी ठरला नाही.सभेच्या सुरूवातीलाच भाजप वगळता सर्व गटनेत्यांनी या विषयावर तहकूबीची सुचना दिली. त्यानंतर झालेल्या भाषणांमध्ये प्रत्येक वक्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव घेत टीका केली. गुढीपाडव्याला या तिघांचे छायाचित्र असलेली जाहिरात प्रसिद्ध झाली. त्यानंतर तब्बल १५ दिवस सगळे नेते झोपले होते. चर्चा होऊ लागल्यावर सरकारला जाग आली. त्यानंतर आमचा काही संबध नाहीचा ओरडा सुरू केला. मात्र बापट यांनी स्वत:च्या उपस्थितीत कंपनीच्या संचालकाला पळून जाण्यासाठी मदत केली असा आरोप करण्यात आला.मनसेचे बाळासाहेब शेडगे, किशोर शिंदे, वसंत मोरे, राजेंद्र वागसकर यांनी मनसेच्या आंदोलनामुळेच सरकार जागे झाल्याचा दावा केला. कंपनीच्या कामकाजाची, त्यांच्याशी संबधित पालिकेत कोणी असेल तर त्यांचीही चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रवादीचे बंडू केमसे, माजी महापौर दत्ता धनकवडे, सुभाष जगताप, नंदा लोणकर यांनी सरकारच्या आशिर्वादाने पुणेकरांची फसवणूक करण्याचा हा डाव होता अशी टिका केली. काँग्रेसच्या अविनाश बागवे, संजय बालगुडे, अरविंद शिंदे यांनी निवडणुकीच्या काळात झालेल्या मदतीची ही वसुली होत असल्याने दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप केला. या सर्व प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करावी, ज्यांचे पैसे घेतले त्यांना ते परत करायला लावावेत यासाठी महापौरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावे अशी मागणी करण्यात आली. भाजपच्या अशोक येनपुरे, धनंजय जाधव, मुक्ता टिळक यांनी पक्षावर होत असलेल्या आरोपांचा प्रतिवाद केला. पंतप्रधान आवास योजना चांगलीच आहे. ज्यांची छायाचित्र प्रसिद्ध झाली त्यांना याची कल्पनाही नव्हती. मेपल कंपनीच्या चौकशीला भाजपचाही पाठिंबाच आहे असे ते म्हणाले. अन्य सदस्य मात्र शांतच होते. सभेत एरवी आक्रमक असणारे भाजपचे गटनेते बीडकर सभेला उपस्थित नव्हते. सर्वांच्या भाषणानंतर महापौर प्रशांत जगताप यांनी सभा तहकूब करीत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, पालकमंत्री गिरीश बापट यांनी मेपल ग्रुपचा संचालक सचिन अगरवाल याच्या समवेत एका चर्चेत सहभाग घेतला व त्यांच्यासमोर त्याने पळ काढला त्यामुळे बापट यांनी नैतिकतेच्या आधारावर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने बुधवारी करण्यात आली. कसबा पेठेतील बापट यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर मनसेच्यावतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. आपल घरच्या जाहीरातीमुळे जनतेची दिशाभूल झाली आहे, राज्य सरकारला याप्रकाराची कल्पना नव्हती असे म्हणणे धाडसाचे ठरेल. मंगळवारी झालेल्या एका चर्चेच्या कार्यक्रमानंतर बापट यांनी सचिन अगरवाल याला सुरक्षितपणे बाहेर पडू दिले. त्यामुळे या प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून बापट यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केली. या आंदोलनात गटनेते बाबू वागस्कर, नगरसेवक बाळा शेडगे, रवी धंगेकर, यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)> सामान्यांवर अन्याय होऊ देणार नाही : बापटपुणे : मेपल ग्रुपने पाच लाखात घर ही योजना शासकीय असल्याचे भासवून सर्वसामान्यांकडून पैसे गोळा केले आहेत़ घराच्या ओढीने ज्यांनी पैसे गुंतविले आहेत, त्या सर्वसामान्यांना न्याय मिळेल आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, यासाठी पालकमंत्री म्हणून आपण काळजी घेणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले़ मेपल ग्रुपने पाच लाखात घर ही योजनेत मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांची छायाचित्रे वापरुन ही योजना शासकीय असल्याचे भासविले़ त्यावर वाद झाल्यानंतर मेपल ग्रुपवर गुन्हा दाखल झाला आहे़ या प्रकरणाबाबत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गिरीश बापट यांची भेट घेऊन पोलिसांनी आज काय कारवाई केली याची माहिती दिली़ बापट म्हणाले, मेपलची बँक खाती सील करण्यात आली असून त्यांनी ज्या जागांवर ही योजना जाहीर करण्यात आली आहे़ त्या जागा कंपनीला विकता येणार नाही़ किंवा हस्तांतरीत करता येणार नाही़ या प्रकरणात आपल्या योजनेचा उल्लेख का करण्यात आला, याचा खुलासा केंद्र व म्हाडा यांनी मेपलकडे मागितला आहे़ हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे़ त्यांनी काही कागदपत्रे कंपनीकडे मागविली आहेत़ आवश्यक तो पुरावा गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे़ क्रेडाईच्या एका कार्यक्रमासाठी ७ ते ८ महिन्यांपूर्वी गेलो होतो़ त्यांचे ६०० सदस्य आहेत़ त्यावेळी ४०० सदस्य आले होते़ अशा कार्यक्रमात अनेक जण भेटत असतात़ हस्तांदोलन करीत असतात़ याचा अर्थ मी त्यांना ओळखतो, असे होत नाही़ या संपूर्ण प्रकरणात कोणावरही अन्याय होणार नाही, असे बापट यांनी सांगितले़