शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
4
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
5
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
6
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
7
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
8
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
9
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
10
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
11
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
12
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
13
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
14
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
15
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
16
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
17
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
18
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
19
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
20
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा

तमाशाऐवजी शाळा करणार डिजिटल!

By admin | Updated: April 23, 2017 02:16 IST

पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रौत्सव २४ एप्रिलपासून सुरू होत आहे. यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु, यात्रेतील तमाशाला

पळवे (जि. अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रौत्सव २४ एप्रिलपासून सुरू होत आहे. यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु, यात्रेतील तमाशाला आणि अवास्तव खर्चाला फाटा देऊन गावची परिषदेची शाळा डिजिटल करण्यात येणार आहे. तसा निर्णय ग्रामस्थांनी ग्रामसभेतच घेतला आहे.यात्रेच्या नियोजनासाठी गावात शनिवारी ग्रामसभा झाली. यावेळी सेवा सोसायटीचे संचालक आप्पासाहेब रसाळ, उपसरपंच दौलत गांगड, संदीप रसाळ, राजेंद्र रसाळ, सुभाष रसाळ, प्रदीप रसाळ यांनी शाळा डिजिटल करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यास तरुणांसह ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मंदा साबळे यांनी लोकसहभागातून शाळेचे दोन वर्ग याआधीच डिजिटल केले आहेत. त्यामुळे मुलांमध्ये शिकण्याची गोडी वाढली आहे. पहिली ते सातवीच्या शाळांमध्ये आणखी पाच वर्ग डिजिटल व्हावेत, अशी पालकांची इच्छा होती. तशी चर्चा ग्रामसभेत झाली आणि यात्रेच्या नियोजनाचा सूरच बदलला. प्रत्येक वर्ग डिजिटल झाल्याशिवाय यात्रेत कोणताही मनोरंजनावर खर्च न करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला. साधारणपणे दोनशे कुटुंबाच्या या गावात आधी प्रत्येक कुटुंबाकडून पाचशे ते एक हजार रुपये वर्गणी गोळा करण्याचा निर्णय झाला होता. मात्र शाळा डिजिटल करण्याचा निर्णय झाल्यानंतर ग्रामसभेतच काही गावकऱ्यांनी दुप्पट वर्गणी देण्याचा निर्णय घेतला आहे. (वार्ताहर) परिवर्तनाच्या वाटेवर यात्रायात्रेदरम्यान सुपा परिसरात रात्री करमणुकीसाठी कार्यक्रम आणण्याची परंपरा आहे. मोठा खर्च करून तमाशा आणला जातो. एका तमाशासाठी एक ते सव्वा लाख रुपये सुपारी घेतली जाते. शाळा डिजिटल करण्यासाठी ८० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. एक वर्ग डिजिटल होऊ शकतो. ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे यात्रा परिवर्तनाच्या वाटेवर गेली आहे.गावचा हा निर्णय अभिनंदनीय आहे. संगणक - इंटरनेटच्या माध्यमातून मुले जगाशी संवाद साधण्यास सक्षम होणार असल्याचा आनंद आहे.- मंदा साबळे, मुख्याध्यापिका