शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

लेखी परीक्षेसाठी शाळांचा शोध सुरू

By admin | Published: May 02, 2016 12:01 AM

मुंबई पोलीस दलातील शारीरिक चाचणी परीक्षा संपत आल्याने आता लेखी परीक्षेबाबतचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी शहर व उपनगरातील उपलब्ध असलेल्या महाविद्यालय

मुंबई : मुंबई पोलीस दलातील शारीरिक चाचणी परीक्षा संपत आल्याने आता लेखी परीक्षेबाबतचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी शहर व उपनगरातील उपलब्ध असलेल्या महाविद्यालय व शाळांबाबत माहिती जमविण्याचे सूचना सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. २२ मे रोजी शंभर गुणांचा लेखी पेपर घेण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यापूर्वी मैदानी स्पर्धेतील पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.सध्या कॉन्स्टेबलच्या पदासाठी १०० गुणांची शारीरिक चाचणी सुरु असून ५ मे पर्यंत ती चालणार आहे. पुरुष उमेदवारांची चाचणी झाली असून शुक्रवारपासून महिलाची धावणे, लांब उडी व अन्य चाचण्या कांजूरमार्ग येथील भरती केंद्रावर सुरु आहेत.मुंबई पोलीस दलातील १ हजार २७५ पदासाठी एकुण १ लाख ५२ हजार ७९ जणांनी आॅनलाईन अर्ज केले होते. त्यामध्ये तरुणीची संख्या ३३ हजार ६२३ इतकी होते. छाननीतून १ लाख ४४ हजार ७८० अर्ज पात्र ठरले होते. शारीरिक चाचणीचा निकाल विविध प्रवर्गानुसार ‘कट आॅफ लिस्ट’ साधारण १५ मे दरम्यान जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर सुमारे शंभरवर महाविद्यालयांसह शाळांमध्ये लेखी परीक्षा घेतली जाईल. साधारण २२ मे रोजी त्यासाठीचा पेपर घेतला जाणार असून त्यापूर्वी दोन दिवस आधी संबंधित निश्चित केलेली परीक्षा केंद्र पोलिसांच्या ताब्यात घेतली जातील. पेपरसाठीची रंगीत तालीम २१ मे रोजी घेण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)