शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

शालेय पोषण आहाराची ‘खिचडी’ कागदावरच!

By admin | Updated: May 26, 2015 02:05 IST

स्टिंग ऑपरेशन; ५0 टक्के शाळा बंद, विद्यार्थ्यांचीही पोषण आहाराकडे पाठ.

अकोला - राज्यातील दुष्काळी परिस्थिती बघता उन्हाळ्य़ाच्या सुटीतही शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात यावे, असा आदेश शासनाने दिला होता. या आदेशाची अंमलबजावणी अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये होतच नसल्याचे 'लोकमत'ने सोमवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळून आले. तिन्ही जिल्हय़ातील ४८0 शाळांमध्ये सकाळी ९ ते ११ या वेळेत लोकमत प्रतिनिधींनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता, २४८ शाळा बंद असल्याचे वास्तव समोर आले. यातील बहुतांश शाळांमध्ये खिचडी खाण्यासाठी विद्यार्थीच येत नसल्याने शाळा व्यवस्थापन समितीने उन्हाळय़ात शालेय पोषण आहार शिजविण्यात येणार नाही, असा ठराव घेऊन शासनाकडे पाठविला, तर विद्यार्थी आहार घेण्यासाठी येत नसल्याने शिक्षक शाळाच उघडत नसल्याचे आढळून आले.उन्हाळय़ाच्या सुटीत शालेय पोषण आहार वाटपाचा आदेश शासनाने काढला असला तरी त्याची अंमलबजावणी होऊन गरजू विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप होते किंवा नाही, हे वास्तव जाणून घेण्यासाठी ह्यलोकमतह्णतर्फे सोमवारी अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यात स्टिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या तिन्ही जिल्ह्यात शालेय पोषण आहार शिजविण्याची वेळ सकाळी ८ ते ११ ही आहे. या वेळेत तिन्ही जिलत शालेय पोषण आहार शिजविण्याबाबतचे वास्तव शासनाने उन्हाळ्य़ाच्या सुटीत आहार वाटपाचा काढलेला आदेश किती अव्यवहारिक आहे, हे स्पष्ट करणारे होते. एकतर विद्यार्थ्यांना शाळेतील खिचडी खाण्यात कोणताही रस नसल्याने त्यांनी शाळेत मिळणार्‍या आहाराकडे पाठ फिरविल्याचे आढळून आले. त्यामुळे तिन्ही जिल्ह्यातील २४८ शाळा कुलूप बंद आढळून आल्यात. बुलडाणा जिल्ह्यातील १८४ शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ६0 शाळांमध्येच खिचडी शिजविण्यात येत होती. उर्वरित १२४ शाळांपैकी बहुतांश शाळा बंद होत्या. विद्यार्थीच येत नसेल तर खिचडी शिजवायची कुणासाठी, असा प्रश्न यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीकडे उपस्थित करण्यात आला. वाशिम जिल्ह्यात १२१ शाळांपैकी ४९ शाळा बंद आढळल्यात. आठ शाळांमध्ये शालेय पोषण आहारच उपलब्ध नव्हता.