शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती घोटाळा : विभागीय चौकशीला अधीन राहून अधिका-यांना केले सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 02:34 IST

राज्यभरात गाजलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाच्या अनेक अधिकाºयांची सध्या चौकशी सुरू आहे.

अभिनय खोपडे वर्धा : राज्यभरात गाजलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाच्या अनेक अधिकाºयांची सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या अधिकाºयांना चौकशीच्या अधीन राहून राज्य सरकारकडून सेवानिवृत्त करण्यात येत आहे. राज्यातील ही दुसरी घटना आहे. तसेच त्यांना तूर्तास सेवानिवृत्तीनंतरचे कोणतेही फायदे देण्यात आलेले नाही, हे विशेष!राज्यात २००९-१० पासून अनेक जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती वाटपात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्यात. त्यानंतर शासनाने सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागात चौकशी समिती गठित करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली.वर्धा जिल्ह्यात या घोटाळ्याचे मूळ असल्याचे शासनाच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. एमएसबीटीई, नॉन-एआयसीटीई मार्फत अल्पमुदतीच्या कायम विना अनुदानित अभ्यासक्रमांना कोट्यवधी रुपयांची शिष्यवृत्ती वाटप करून सामाजिक न्याय विभागातील अधिकाºयांनी गैरव्यवहार केले. त्यानंतर वर्धा जिल्ह्यात या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या समितीने राज्य शासनाला मे २०११ मध्ये आपला अहवाल सादर केला.चौकशी समितीने दोषी अधिकाºयांची नावेही शासनाकडे सादर केली होती. यावरून शासनाने प्रथम ३१ जुलै २०१५ रोजी सहायक समाज कल्याण उपायुक्त एस.एम. कांडलकर यांना चौकशी अहवालाच्या अधीन राहून सेवानिवृत्त केले.वर्धा जिल्ह्यात समाज कल्याण विभागात अधिकारी म्हणून कार्यरत असताना शिष्यवृत्ती घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप चौकशी समितीने केला होता. त्यानंतर आता समाज कल्याण विभागाचे नागपूर येथील प्रादेशिक उपायुक्त एम.एस. झोड यांनाही विभागीय चौकशीच्या अधीन राहून शासनाने ३१ आॅगस्ट २०१७ रोजी सेवानिवृत्त केले आहे. त्यांचाही या शिष्यवृत्ती घोटाळ्यात सहभाग असल्याचा चौकशी समितीचा ठपका आहे.