शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

मागास विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली

By admin | Updated: June 15, 2017 04:34 IST

सामाजिक न्याय विभागाची वेबसाईटच बंद असल्यामुळे ओबीसी आणि अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे वाटपच थांबले आहे.

- यदु जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सामाजिक न्याय विभागाची वेबसाईटच बंद असल्यामुळे ओबीसी आणि अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे वाटपच थांबले आहे. शिवाय, केंद्र सरकारकडून येणे असलेली शिष्यवृत्तीचा निधी अद्याप मिळालेला नाही. नव्या शैक्षणिक वर्षाच्या आरंभीच शिष्यवृत्ती न मिळाल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. राज्य शासनाने ओबीसी, एससी, व्हीजेएनटी, एसबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपकरता २७५ कोटी ३३ लाख रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम ३० जूनपर्यंत खर्च होणे अपेक्षित असताना त्यातील १०३ कोटी ५५ लाख रुपयांचेच वाटप अद्याप झालेले आहे. १७१ कोटी ७७ लाख रुपयांचे वाटप होऊ शकलेले नाही. शिवाय, विभागाची वेबसाईट ४५ दिवसांपासून बंद असल्याने १०३ कोटींचे वाटप कोणाला झाले याचाही हिशेब लागत नाही. धक्कादायक बाब म्हणजे ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीपोटी योजनांतर्गत निधीतून केंद्र सरकार महाराष्ट्राला दरवर्षी निधी देते. तथापि, २०१७-१८ मध्ये त्यातील एकही छदाम अद्याप मिळालेला नाही. सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव दि.रा.डिंगळे यांनी लोकमतला सांगितले की, विविध विभागांच्या सर्व प्रकारच्या आर्थिक बाबी एकाच पोर्टलवर आणण्याचे काम माहिती व तंत्रज्ञान विभाग करीत आहे. त्यामुळे आमची यंत्रणा ठप्प आहे. तथापि, आधीच्या पद्धतीनुसार प्रलंबित शिष्यवृत्ती प्रकरणांचा निपटारा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्कॉलरशिप घोटाळ्यात काही संस्थांवर अन्यायआघाडी सरकारच्या काळात झालेल्या स्कॉलरशिप घोटाळ्याप्रकरणी राज्यात काही संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संबंधीचे वृत्त लोकमतने ४ जूनच्या अंकात दिले होते. त्यात पुणे येथील तुकाराम पठारे कॉलेज आणि रेड पिक्सल अ‍ॅनिमेशन कॉलेज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे म्हटले होते. मात्र, त्यातील फक्त रेड पिक्सल कॉलेजविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पठारे कॉलेजविरुद्ध गुन्हा दाखल केला नसल्याचे तपास यंत्रणेने स्पष्ट केले. तक्रारकर्ता विद्यार्थी हा पठारे कॉलेजमध्ये शिकत होता पण त्याच्या नावावर पिक्सल कॉलेजने शिष्यवृत्ती लाटल्याचे हे प्रकरण आहे. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केंद्र सरकारने अत्यल्प रक्कम दिल्याने या शिष्यवृत्तीचा भार राज्य सरकारवर आला आहे. केंद्राने जवळपास ६०० कोटी रुपये देणे अपेक्षित असताना केवळ ७७ कोटी ९२ लाख रुपयेच दिले आहेत.