शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

By admin | Updated: July 4, 2016 04:52 IST

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवेचे वेळापत्रक गेल्या १० दिवसांत कोलमडले.

मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवेचे वेळापत्रक गेल्या १० दिवसांत कोलमडले. दोन विविध घटनांमध्येच ३00पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या; तर याच १० दिवसांत लोकल उशिराने धावण्याचे प्रमाण हे १०-१५ मिनिटे राहिल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. लोकलमध्ये बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे, सिग्नलमध्ये बिघाड होणे इत्यादी कारणांमुळे लोकल सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. तसेच तांत्रिक बिघाड होऊ नये यासाठी देखभाल-दुरुस्तीवरही विशेष लक्ष देण्यास सांगितले होते. तरीही मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गांवर वारंवार बिघाड होत आहेत. २१ जूनला पडलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर लोकलचा खोळंबा झाला. लोकल उशिराने धावत असल्याने दिवा येथे प्रवाशांकडून आंदोलन करण्यात आले आणि त्याचवेळी दिवा पारसिक बोगद्यात समस्या उद्भवल्याने ब्लॉक घेऊन ती समस्या सोडवण्यात आली. या सर्व गोंधळामुळे तब्बल २५३ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. २३ जून आणि २८ जूनला सीएसटीला जाणाऱ्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे मध्य रेल्वेवरील सेवा विस्कळीत होतानाच अनेक लोकल फेऱ्यांना लेट मार्क लागला. २९ जून रोजी ऐरोलीजवळ फिडर तुटल्याने ठाणे ते वाशी लोकल फेऱ्यांवर परिणाम झाला आणि जवळपास ५४ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या दोन घटनांमुळे २00पेक्षा जास्त लोकल फेऱ्यांना लेट मार्कही लागला. >मध्य रेल्वेवर घडलेल्या महत्त्वाच्या घटना२१ जून - मेन लाइनवर तीन घटनांमुळे २५३ लोकल फेऱ्या रद्द. २३ जून - सीएसटीला जाणाऱ्या जलद लोकलमध्ये बिघाड. दादर स्थानकातील घटना.२८ जून - अंबरनाथहून सीएसटीला जाणाऱ्या जलद लोकलमध्ये तांत्रिक बिघाड.२९ जून - ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर सेवा ठप्प, ५४ फेऱ्या रद्द.