शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडे मराठी अनुवादकांचा तुटवडा

By admin | Updated: March 28, 2016 00:39 IST

कामकाजात मराठीचा आग्रह धरला जात असताना त्यासाठी आस्थापन उपलब्ध करून देण्याबाबत मात्र राज्य शासन उदासीनता असल्याचे दिसत आहे. गेल्या १० वर्षांपासून शासनाच्या भाषा

- सायली जोशी- पटवर्धन, पुणेकामकाजात मराठीचा आग्रह धरला जात असताना त्यासाठी आस्थापन उपलब्ध करून देण्याबाबत मात्र राज्य शासन उदासीनता असल्याचे दिसत आहे. गेल्या १० वर्षांपासून शासनाच्या भाषा संचालनालयातील मराठीत अनुवादकांची २० हून अधिक पदे रिक्त असल्याच्या वृत्ताला संचालिका मंजुषा कुलकर्णी यांनी दुजोरा दिला आहे.तसेच शासनालाच नव्हे, तर खासगी संस्थांनाही उत्तम मराठीत अनुवाद करू शकणाऱ्या व्यक्ती सापडणे दुरापास्त झाले आहे. मराठी अनुवाद क्षेत्रातही उत्तम करिअर होऊ शकते, याबाबत विद्यार्थ्यांना वेळोवेळी माहिती आणि प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे एका खासगी भाषांतर संस्थेच्या संचालिका देवकी कुंटे म्हणाल्या. मराठी अनुवादकांसाठी गेल्या २ वर्षांपासून विद्यापीठ आणि पुण्यातील विविध महाविद्यालयांमध्ये संपर्क केला असताही अनुवादाच्या कामासाठी पात्र व्यक्ती मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले.सध्या विद्यार्थ्यांचा परदेशी भाषा शिकण्याकडे कल आहे. मात्र मातृभाषेकडे तरुणांचे दुर्लक्ष होत आहे. आपली भाषा समृद्ध असून त्यातही उत्तम करियर करता येऊ शकते, मात्र याबाबत विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती आणि प्रशिक्षण मिळत नाही, या वस्तुस्थितीकडे कुंटे यांनी लक्ष वेधले.भाषा संचालनालयातील अनुवादकांच्या २० हून अधिक जागा रिक्त आहेत. या जागा लोकसेवा आयोगाकडून विशिष्ट प्रक्रियेतून भरण्यात येतात. त्याची प्रक्रिया सध्या सुरू असून येत्या काही दिवसातच त्या भरल्या जातील.- मंजुषा कुलकर्णी, भाषा संचालक, भाषा संचालनालयअनुवादकांची संख्या वाढावी यासाठी राज्य मराठी विकास संस्थेतर्फे प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात येणार आहे. अनुवादकांची विशेष यंत्रणा उभी राहावी, यासाठी संस्था विशेष प्रयत्न करेल.- डॉ. आनंद काटीकर, प्रभारी संचालक, राज्य मराठी विकास संस्था