शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

‘मोठा भाऊ’ सांगा, राम मंदिर कधी बनणार? - प्रवीण तोगडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 06:11 IST

गेल्या चार वर्षात राम मंदिराच्या मुद्यावर अपयशी राहिलेल्या केंद्र सरकारवर टीका करीत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय

नागपूर : गेल्या चार वर्षात राम मंदिराच्या मुद्यावर अपयशी राहिलेल्या केंद्र सरकारवर टीका करीत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. सर्वच जण आपल्या ‘मन की बात’ करीत आहेत. रामजीच्या मनातील बात तर कुणी ऐका. भगवान राम यांना अयोध्येत राहण्यासाठी घर नाही. त्यांना घर कधी मिळेल, याचे उत्तर माझा ‘मोठा भाऊ ’अर्थात नरेंद्र मोदींनी द्यावे, असेही ते म्हणाले.रामनवमीच्या पर्वाचे निमित्त साधत धंतोली येथील विहिंप कार्यालयात पत्रकारांशी चर्चा करताना डॉ. तोगडिया म्हणाले, राम मंदिराबाबत १९८४ पासून प्रकरण सुरू आहे. सद्यस्थितीत न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिर उभारले जाईल, असे सरकार सांगत आहे. असे आहे तर राम मंदिराच्या मुद्यावर आंदोलन का उभारण्यात आले. लाखो कार सेवक एकत्र आले, हजारोंना तुरुंगात जावे लागले. शेकडोंनी बलिदान दिले. मात्र, २०१४ मध्ये सत्ता सांभाळताच राम मंदिरला विसरले.१९७२ पासून आपले मोदींशी व्यक्तिगत संबंध आहेत. आपले त्यांच्या घरी जाणे येणे होते. मोदी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची पाकिस्तानात जाऊन भेट घेऊ शकतात, तर माझी का नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला.रोजगार, शिक्षण, कर्जमाफीत सरकार अपयशीकेंद्र सरकार २० कोटी युवकांना रोजगार, उत्तम शिक्षण, शेतकऱ्यांना कर्जमाफी व चार लाख काश्मिरी पंडितांना हक्काचे घर देण्यात अपयशी ठरल्याची टीका तोगडिया यांनी केली. शेतकºयांचा कापूस, डाळींच्या भावात ३० टक्क्यांहून घसरण झाली, असेही ते म्हणाले.