पिंपळगावला टोमॅटोबाबाची भोंदूगिरी : महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, दिल्लीतून दररोज येतात लाखो भाविक
पुणो : पिंपळगाव (ता.दौंड) येथे स्वत:ला महाराज म्हणवून घेणा:या नितीन थोरात याला देवीचा साक्षात्कार झाला असून, देवीच्या मंदिर परिसरात प्रसाद म्हणून दिलेला ‘अमृतरस’ 52 आजार बरे करतो. त्यामुळे उपचार म्हणून रस घेण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, दिल्ली, लाखो लोक येथे येत आहेत. शुक्रवार ते मंगळवार या पाच दिवसांच्या कालावधीत प्रतिदिनी 3 लाखांवर लोक येथे हजेरी लावत आहेत.
नितीन थोरात याला फिरंगाई देवी प्रसन्न झाली. त्यानंतर त्याने मंदिराचा जीर्णोद्धार केला, असे लोक सांगतात. त्यानंतर महाराजांनी गुडघेदुखी, हृदयरोग, कॅन्सर, मधुमेह यांसारख्या 52 आजारांवर औषध देण्यास
सुरुवात केली. या औषधात टोमॅटो, झाडाची साल, वनस्पतींची मुळे यांचा समावेश आहे. एका मोठय़ा भांडय़ात हा रस एकत्रित करून वगराळ्याने हा रस भाविकांना दिला जातो. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील सुशिक्षितांचाही नितीन थोरात यांना मानणा:याध्ये समावेश आहे.
या ठिकाणी कसलाही जादूटोणा, गंडादोरा नाही. केवळ प्रसाद म्हणून भाविकांना रस दिला जातो. या औषधातून आजार बरे होतात हा माझा दावा नसून भाविकांचा आहे. त्यामुळे मी याबाबत अधिक बोलणार नाही. अंधश्रद्धा निमरूलन समितीने या विरोधात यापूर्वी अनेकदा आवाज उठवला आहे. मात्र यात कुठलीही भोंदुगिरी केली जात नाही, असे नितीन थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कथित अमृतरसाचे औषधी व अन्नाचे गुणधर्म तपासण्यासाठी दोन नमुने पंधरा दिवसापुर्वीच ताब्यात घेण्यात आले आहेत. प्रयोगशाळेकडून बुधवारी (दि. 17) त्याचा अहवाल येण्याची अपेक्षा आहे. या रसात टोमॅटो व विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीचे मिश्रण आहे. त्यामुळे कॅन्सर, मधुमेह या सारखे दुर्धर आजार बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे सह आयुक्त शशिकांत केकरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)
अमृतरसाने 52 आजार बरे करण्याचा दावा करणा:या दौंडमधील भोंदूबाबाविरूद्ध पोलिसांकडे लेखी तक्रार करणार आहे. त्यानंतर पोलिसांनी कारवाई न केल्यास आम्ही आमच्यापध्दतीने आंदोलन करू. टोमॅटो रसाने जर आजार बरे होत असतील तर लोक घरीच हा रस बनवून पितील. त्यासाठी भोंदूबाबाकडे येण्याची काय गरज आहे. भोंदूबाबाच्या हाताने तो रस दिल्याने आजार बरे होतात हा दावा करणो जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा आहे. त्यामुळे तातडीने कारवाई होणो आवश्यक आहे.
- मिलिंद देशमुख,
राज्य सचिव, अंनिस
4कथित अमृतरसाचे औषधी व अन्नाचे गुणधर्म तपासण्यासाठी दोन नमुने पंधरा दिवसापुर्वीच ताब्यात घेण्यात आले आहेत. प्रयोगशाळेकडून बुधवारी (दि. 17) त्याचा अहवाल येण्याची अपेक्षा आहे.