शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे सवाई महोत्सव लांबणीवर

By admin | Updated: December 13, 2014 00:15 IST

राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला फटका बसला.

पुणो : राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला फटका बसला. अगदी शेवटच्या क्षणार्पयत वाट पाहूनही पाऊस थांबण्याची शक्यता दिसत नसल्याने महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. राज्यात आणखी चार दिवस पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली असल्याने जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये नव्याने महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. आत्ताच्या तिकिटावरच  महोत्सवाचा आस्वाद घेता येणार आहे. 
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची  आजची 3.3क् ही नियोजित वेळ ठरलेली होती. परंतु दीडच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. संपूर्ण स्वरमंडप गळायला सुरुवात झाली. मात्र, पावसाची चिकचिक असूनही हजारो रसिक उपस्थित होते. तब्बल दीड तास रसिक बसून होते.  त्यामुळे पाच वाजता महोत्सव सुरू करण्याची घोषणा आयोजकांकडून करण्यात आली. मात्र, त्याच वेळी पुन्हा पावसाचा शिडकावा सुरू झाला. त्यामुळे शेवटी आयोजकांकडून महोत्सव पुढे ढकलण्याची घोषणा करण्यात आली. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात होणा:या महोत्सवाचा आस्वाद आत्ताच्या तिकिटांवरच घेता येईल, असे सांगून आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी रसिकांना मोठा दिलासा दिला. निसर्गाच्या लहरीमुळे महोत्सव रद्द झाल्याने रसिकही कोणताही नाराजीचा सूर प्रकट न करता मंडपातून माघारी परतले. आज दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे स्वरमंडपाचा पूर्णत: बोजवारा उडाला. खांब उखडलेले, स्टेजवर पाणी, सगळीकडे चिखलाचे साम्राज्य, कार्पेट पाण्याने ओले  चिक्क, असे चित्र पाहायला मिळत होते. मात्र, तरीही रसिकांनी स्वरमंडप सोडला नाही. पावसाने आयोजकांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले. तत्काळ हालचाली करीत महोत्सवाच्या 40 हजार चौरस फूट जागेत ताडपत्री आणि वरून प्लॅस्टिक टाकण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. मात्र, पाऊस थांबत नसल्याने मंडळाच्या पदाधिका:यांनी बैठक घेऊन महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)
 
जानेवारी, फेब्रुवारीत नव्याने होणार आयोजन
चाळीस वर्षापूर्वी असाच मुसळधार पाऊस झाला होता. त्या वेळी गोखले मंडपवाल्यांनी रसिकांना बसायला पाट दिले होते. मात्र, पाऊस सुरूच राहिल्याने महोत्सव पुढे ढकलावा लागला. 1999ला हीच परिस्थिती होती. 2क्1क् मध्ये स्वाइन फ्लूच्या थैमानामुळे जानेवारीत महोत्सवाचे आयोजन केले होते. 
 
अवकाळी पावसामुळे विजेचा आणि पाण्याचा धोका आहे. महोत्सव उद्या आणि परवाही घेता येऊ शकतो; मात्र रसिकांच्या जिवाशी आम्ही खेळू शकत नाही. म्हणून महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
- श्रीनिवास जोशी, 
कार्याध्यक्ष, आर्य प्रसारक मंडळ