शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॅट संस्कृतीमुळे कळवळा हरवला - डॉ.अनिल अवचट

By admin | Updated: September 23, 2016 20:11 IST

आजच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये कळवळा हरवला आहे. दुस-याचं दु:ख पाहून कळवळा येत नसेल तर त्याला माणूस कसं म्हणायचं असं मत जेष्ठ समाजसेवक डॉ.अनिल अवचट यांनी व्यक्त केले.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 23 -  आजच्या फ्लॅट संस्कृतीमध्ये कळवळा हरवला आहे. दुस-याचं दु:ख पाहून कळवळा येत नसेल तर त्याला माणूस कसं म्हणायचं असं मत जेष्ठ समाजसेवक डॉ.अनिल अवचट यांनी व्यक्त केले. 
आर्टिस्ट्री आयोजित देणे समाजाचे या उपक्रमाचे उद्घाटन चाणक्य मंडलचे अध्यक्ष डॉ.अविनाश धमार्धिकारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अवचट प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी आर्टिस्ट्रीच्या संयोजिका वीणा गोखले मंचावर उपस्थित होत्या.
     सध्या समाजात पैसा म्हणजेच सर्वकाही असे तत्वज्ञान झाले आहे,पैसा माणसाला अतृप्त ठेवतो,तो कितीही मिळाला तरी कमी वाटतो. असेही अवचट पुढे म्हणाले. प्रदर्शनाविषयी बोलताना ते म्हणाले की समाजात चांगलं काम करणा-यांचा हा मेळा आहे.सामाजिक काम हेच खरं वैभव आहे,तुमचं सामाजिक काम हे किती छोटं आहे की मोठं हे महत्त्वाचं नसून त्या कामा मागील आत्मियता महत्त्वाची आहे.
    सामाजिक संस्थांच्या मागे शासनाने उभं राहिलं पाहिजे असं मत डॉ.अविनाश धमार्धिकारी यांनी यावेळी व्यक्त केले.
    आर्टिस्ट्रीतर्फे गेल्या १२ वर्षापासून सामाजिक संस्थांचे काम समाजासमोर आणण्यासाठी देणे समाजाचे या उपक्रमाअंतर्गत  विविध सामाजिक क्षेत्रात काम करणा-या संस्थाची माहिती देणारे प्रदर्शन भरवण्यात येते. यंदा अशा संस्थांचे २७ स्टॉल असून त्यांच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहचण्यास या उपक्रमाच्या माध्यमातून मदत होत आहे. हे प्रदर्शन २५ सप्टेंबर पर्यंत हर्षल हॉल कर्वे रस्ता येथे सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत सर्वांना पाहण्यास खुले आहे. उद्घटनाच्याच दिवशी या प्रदर्शनाला पुणेकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.