शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पतीला किडनी देऊन ‘त्या’ बनल्या आधुनिक सावित्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:46 IST

वैरागमध्ये डेंग्यूचा बळी: कुंकवाचा धनी अन् पोटचा गोळाही गेला; नियतीचा अजब खेळ; वैरागमध्ये शोक

ठळक मुद्देकुंकवाच्या धन्याला वाचवण्यासाठी त्या आधुनिक सावित्री बनल्यादोन वर्षांपूर्वी पती सूर्यकांत यांचे निधन झाले, एवढा मोठा आघात सोसून नीलावती सावरल्यानियतीचा हा अजब खेळ तिच्याच वाट्याला का, अशा भावना व्यक्त

धनाजी शिंदे 

वैराग : सुखी संसार सुरू होता़ पती शिकवणी घेऊन मुलांना शिकवायचे अन् संसाराचा गाडाही चालावायचे़ पण अचानक त्यांना किडनीचा आजार बळावला़ परिणामी तो आजार बरा व्हावा, म्हणून तब्बल १७ एकर जमीन विकली आणि खर्च भागविला़ पण किडनी मिळेना. अखेर पत्नी नीलावती यांनी स्वत:ची एक किडनी पतीला दिली़ पतीला किडनी देऊन ‘त्या’ आधुनिक सावित्री बनल्या़ मात्र तरीही त्या पतीला वाचवू शकल्या नाहीत़ अखेर कुंकवाचा धनी आणि आता पोटचा गोळाही डेंग्यूच्या आजाराने गेला़ नियतीचा हा अजब खेळ तिच्याच वाट्याला का, अशा भावना व्यक्त करीत वैरागमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

पेशाने शिक्षक असलेले पती सूर्यकांत माने (कौठाळी, ता. उत्तर सोलापूर) हे येथील मूळ रहिवाशी होते. ते सातारा, पुणे चिंचवड येथे खासगी शिकवणीचे वर्ग चालवत होते. दरम्यान, त्यांना किडनीचा आजार जडला. त्यामुळे ते वैराग येथे स्थायिक झाले व येथेच शिकवणी वर्ग चालू केले. दरम्यान, आजार बळावत गेला. आजाराच्या खर्चासाठी त्यांनी स्वत: कमावलेली सीनादारफळ (ता. माढा) येथील १७ एकर जमीन विकली आणि खर्च भागवला. परंतु किडनी मिळत नसल्याने शेवटी त्यांची पत्नी नीलावती यांनी आपली एक किडनी देऊन पतीला जीवनदान दिले. 

कुंकवाच्या धन्याला वाचवण्यासाठी त्या आधुनिक सावित्री बनल्या. परंतु दोन वर्षांपूर्वी पती सूर्यकांत यांचे निधन झाले. एवढा मोठा आघात सोसून नीलावती सावरल्या. परंतु नियतीला हे मान्य झाले नाही. माने कुटुंबावरील उद्भवलेल्या दुर्दैवी प्रसंगामुळे वैराग व परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

एमपीएससीची अंतिम परीक्षा राहिली- पतीच्या निधनानंतर नीलावती या स्वत:ला सावरत मोठा मुलगा सूरजला इंजिनिअर बनवले. मुलगी श्रद्धा एमएस्सी झाली़ लहान मुलगा सुदर्शन सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. सर्व मुलांना तिने उच्चशिक्षित बनविले़ परंतु नियतीने इंजिनिअर झालेल्या सूरजवर घाला घातला आणि दुसरा मोठा आघात माने कुटुंबावर झाला. मयत सूरज हा मेकॅनिकल इंजिनिअर झाला होता. या दरम्यान त्याला काम नसल्याने एमपीएससी परीक्षा देऊन तो उत्तीर्ण झाला व शेवटची अंतिम परीक्षा देणे राहिली होती. 

संसारोपयोगी साहित्यापेक्षा पुस्तकांचे भांडार अधिक- वैराग येथील माने यांच्या घरात संसारोपयोगी भांडी कमी, परंतु पुस्तकांचे मात्र भांडार आहे. कै. सुर्यकांत माने यांचे शिकवणी वर्ग चालत होते.विद्याथ्यार्ना अभ्यासासाठी लागणाºया नोटस्, क्रमिक पुस्तके, मराठी, इंग्रजी , हिन्दीमधील स्पर्धा परिक्षेची पुस्तके अशा विविध पुस्तकांनी पुर्ण घर भरले आहे. शिकवणी हॉलमधील फळ्यावर सुर्यकांत माने यांनी दोन वषार्पूर्वी शेवटच्या क्षणी लिहिलेला मजकुर आजही जपून ठेवलेला आहे.' शिक्षण हेच सर्वस्व , तेच जीवनाचे सार्थक माणून माने कुटुंबियांनी हा अनमोल ठेवा जपुन ठेवला असल्याचे त्यांचे नातेवाईक नेताजी घायतिडक यांनी  सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरWomenमहिलाSpecial 5 Serialस्पेशल ५Organ donationअवयव दान