शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बिरवडीत साकारला सावित्री दुर्घटना देखावा

By admin | Updated: September 9, 2016 03:13 IST

महाड तालुक्यातील बिरवाडी जुनी बाजारपेठे येथील अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपली परंपरा कायम ठेवत, ब्रिटिशकालीन सावित्री पूल दुर्घटनेचा देखावा साकारून सर्वांचे लक्ष वेधले आहे

दीपक साळुंखे ,  बिरवाडीमहाड तालुक्यातील बिरवाडी जुनी बाजारपेठे येथील अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपली परंपरा कायम ठेवत, ब्रिटिशकालीन सावित्री पूल दुर्घटनेचा देखावा साकारून सर्वांचे लक्ष वेधले आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे महाविद्यालयीन तरुणांनी एकत्र येऊन हे मंडळ तयार केले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून गणोशोत्सव काळामध्ये विविध सामाजिक विषयांवर प्रकाश टाकणारा देखावा मंडळाकडून साकारण्यात येतो. या वर्षी मंडळाने सावित्री पूल दुर्घटनेची दाहकता दर्शविणारा देखावा साकारला आहे. २ आॅगस्ट २०१६ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास सावित्री नदी पात्रात बुडून ३२ प्रवाशांना प्राण गमवावा लागला होता. यामध्ये १४ लोकांचे मृतदेह मिळाले असून, १३ दिवस या ठिकाणी एनडीआरएफ, नौदल, महसूल कर्मचारी, पोलीस यांनी मदतकार्यामध्ये घेतलेला सहभाग. स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था यांनी केलेली मदत, तसेच या घटनेप्रसंगी देवदूत म्हणून धावून आलेल्या बसंतुमारे यांच्यासह या दुर्घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार, खासदार, मंत्री यांनी भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांचे केलेले सांत्वन या सर्व बाबींचा समावेश या देखाव्यामध्ये करण्यात आला आहे.मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव लांडगे, उपाध्यक्ष अनिकेत भिसे, खजिनदार कल्पेश सागवेकर, सेक्रेटरी नीरज पारेख, अक्षय गांधी हे गणेशोत्सवात वेगवेगळ्या देखावे सादर करून मंडळाचे वेगळेपण कायम जपत आहेत.