शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माळढोक वाचवा, संवर्धनासाठी जगभरातून आवाहन; ‘आययूसीएन’च्या जागतिक परिषदेत ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 06:05 IST

हा पक्षी वर्षातून एकदाच अन् एकच अंडे देतो, तेही उघड्या शेतात. त्या अंड्यातून पिल्लू जन्मेपर्यंत त्याचे रक्षण होण्याची गरज असते

शीतलकुमार कांबळे

सोलापूर : माळढोक या देखण्या पक्ष्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना त्याच्या संवर्धनाची काळजी आंतरराष्ट्रीय पातळीवर वाहिली जात आहे. नुकत्याच फ्रान्समध्ये झालेल्या ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर’च्या (आययूसीएन) परिषदेमध्ये या पक्ष्याचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्याचा ठराव करण्यात आला. सोलापुरातील पक्षीप्रेमींनी या ठरावाचे स्वागत केले आहे.

नान्नजच्या माळढोक अभयारण्यामुळे सोलापूरची ओळख जागतिक पातळीवरील पक्षीप्रेमींमध्ये झाली. एकेकाळी सोलापूर परिसरात या राजस पक्ष्यांची संख्या शंभराहून अधिक नोंदली होती. त्यात वाढ होण्याऐवजी ती वरचेवर घटत चालल्याचे चित्र आहे. दहा वर्षांपूर्वी १६ माळढोक आढळल्याची नोंद असताना  इथे सध्या तीनच पक्षी असल्याचे पक्षी निरीक्षक सांगतात.

हा पक्षी वर्षातून एकदाच अन् एकच अंडे देतो, तेही उघड्या शेतात. त्या अंड्यातून पिल्लू जन्मेपर्यंत त्याचे रक्षण होण्याची गरज असते. मात्र, श्वान, घोरपडी ती अंडी खाऊन टाकतात. या पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात शिकार केल्याने सध्या हा पक्षी दुर्मीळ होत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर काही राजकीय हितसंबधांमुळेही या अभयारण्याच्या क्षेत्रावर संक्रांत आली. अभयारण्य असलेल्या परिसरातील दगड खाणींमुळे माळढोकच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला.

आंतरराष्ट्रीय पातळीवरून मिळू शकते मदतमाळढोकचा विषय हा आता ‘आययूसीएन’च्या जागतिक स्तरावर होणाऱ्या संवर्धन कार्यक्रमांचा आणि धोरणांचा एक अविभाज्य भाग बनणार आहे. यामुळे कृत्रिम प्रजननासारखे उपाय करून माळढोकची संख्या वाढविण्याचे प्रयत्न होऊ शकतात. संशोधन व संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय मदत मिळू शकते. माळढोकचा विषय हा आता ‘आययूसीएन’च्या जागतिक स्तरावर होणाऱ्या संवर्धन कार्यक्रमांचा आणि धोरणांचा एक अविभाज्य भाग बनणार आहे. यामुळे कृत्रिम प्रजननासारखे उपाय करून माळढोकची संख्या वाढविण्याचे प्रयत्न होऊ शकतात. संशोधन व संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय मदत मिळू शकते.